`आम आदमी पक्षा`ची पत्रकार परिषद महागड्या हॉटेलमध्ये!
आम आदमी पक्षाचा अकोला जिल्ह्यात पहिलाच जाहीर कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमासंदर्भात आयोजित `आप`ची पत्रकार परिषद शहरातील एका महागड्या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं `आम आदमी पक्षा`च्या `खास` पणाची अकोल्यात चांगलीच चर्चा होतेय.
Jan 7, 2014, 08:00 PM ISTआम आदमीला राज्यात परिवर्तनाची स्वप्नं
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने यश मिळवल्यानंतर आता राज्यातही आम आदमी पार्टीच्या नेत्यांना परिवर्तनाची स्वप्नं पडू लागलीयत. पुणे जिल्ह्यातल्या मावळ लोकसभा मतदार संघात मारुती भापकर किंवा उल्का महाजन या निवडणूक लढवतील, अशी घोषणाच स्थानिक पातळीवर करण्यात आलीय.
Jan 7, 2014, 06:44 PM ISTसलमानची ‘आम आदमी’ला तंबी!
कुठलाही नेता किंवा राजकीय पक्ष स्वत:ला सुशासन आण्यासाठी सिद्ध करत नाही तोपर्यंत `जय हो` च्या एकाही संवादाचा किवा गाण्याचा वापर करू नये, अशी तंबी खुद्द सलमान खाननं सर्व राजकीय पक्षांना दिलीय.
Jan 5, 2014, 10:17 PM IST‘आप’ हमे अच्छे लगने लगे! कॉर्पोरेट विश्व वळलं ‘आप’कडे!
आम आदमी पार्टीनं केवळ दिल्लीकरांवरच जादू केलेली नाही... तर कॉर्पोरेट विश्वातील `बिग बॉस` मंडळींसोबतच सामान्य नागरिकांवरही अरविंद केजरीवालांच्या या नव्या राजकीय पक्षानं गारूड केलंय... गेल्या ८ डिसेंबरला दिल्लीचा निकाल लागल्यापासून, जवळपास ४ लाखांहून अधिक लोकांनी `आप`चं सदस्यत्व स्वीकारलंय...
Jan 2, 2014, 10:24 PM ISTअरविंद केजरीवालांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव
अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलंय. एकूण ३७ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव ‘आप’ सरकारनं जिंकला. विधानसभेत याबाबत मतदान पार पडलं.
Jan 2, 2014, 06:59 PM ISTमहाराष्ट्रातही वीजेचे दर कमी करा- संजय निरुपम
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढं आलीये. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचेच खासदार संजय निरुपम यांनीच ही मागणी पुढं केलीये.
Jan 1, 2014, 07:34 PM IST‘आप’नं फेटाळला ‘स्वाभिमानी’चा प्रस्ताव!
शेतकऱ्यांसंदर्भातल्या आमच्या अटी मान्य केल्या तर ‘आप’सोबत आघाडी करणार असल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं होतं. मात्र अटींवर आधारीत राजकारण ‘आप’च्या तत्वात बसत नसल्याचं सांगून राजू शेट्टींचा सशर्थ आघाडीचा प्रस्ताव आम आदमी पार्टीनं फेटाळून लावलाय.
Jan 1, 2014, 07:22 PM IST...आणि ‘आप’चे मंत्री विधानसभेत पोहोचले रिक्षानं
दिल्ली विधानसभा अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी आम आदमी पार्टीचे सर्वच नवनियुक्त आमदार विधानसभेत पोहचले. कोणत्याही सरकारी सुविधेचा वापर न करण्याचा निर्धार आपच्या आमदारांनी केलाय.
Jan 1, 2014, 06:58 PM ISTदिल्लीकरांना नववर्षाचं गिफ्ट, तीन महिने पाणी फुकट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीत मोफत पाणी पुरवठ्याचं आश्वासन पूर्ण केलंय. १ जानेवारीपासून मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा करून दिल्लीकरांना नवीन वर्षाची भेट दिलीय.
Dec 30, 2013, 06:16 PM ISTमहाराष्ट्राला ‘आप’लं करण्यासाठी केजरीवालांची सेना सज्ज!
अरविंद केजरावाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इकडे महाराष्ट्रामध्ये ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आपच्या घोडदौ़डीची तयारी सुरु केली आहे. यासाठी ठिकठिकाणी आपची कार्यालयं उघडत आहेत. यांचा प्रयत्न एकच, दिल्लीप्रमाणं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडविणं.
Dec 29, 2013, 09:03 PM ISTअण्णांना आहे अरविंद केजरीवालांवर विश्वास!
दिल्लीत आज काँग्रेसच्या हाताचा आधार घेत आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीकरांना दाखवलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आज सरकार स्थापना केली.
Dec 28, 2013, 07:14 PM IST‘आप’ मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कामकाजाला सुरुवात!
नवनिवार्चित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेताच आपल्या कामकाजाला सुरुवात केली. त्यांच्या टीममधील मंत्रीमंडळाची ही तोंडओळख...
Dec 28, 2013, 05:16 PM ISTदिल्लीत ‘आप’चीच सत्ता, अरविंद केजरीवाल नवे मुख्यमंत्री
दिल्लीत आता आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याचं ‘आप’नं स्पष्ट केलंय. आज आम आदमी पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. पत्रकार परिषद घेऊन केजरीवालांनी आपण आज नायब राज्यपालांना भेटायला जाणार असून सत्ता स्थापनेसाठी पत्र देणार आहे.
Dec 23, 2013, 12:09 PM ISTदिल्लीत ‘आप’चं सरकार, आज होणार घोषणा
दिल्लीमध्ये सरकार स्थापनेकडे आम आदमी पार्टी आता कूच करतेय... अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे… आम आदमी पक्षाच्या जनमत चाचणीत दिल्लीकरांनी हा कौल दिलाय.
Dec 23, 2013, 08:28 AM IST‘आप’च्या काँग्रेस-भाजपसमोर १८ अटी
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आम आदमी पार्टीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं जाहीर केल्यानंतर दिल्लीच्या सत्तेच्या पेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांनी मात्र पाठिंबा घेण्यासाठी या दोन्ही पक्षांसमोर १८ अटी ठेवल्या आहेत.
Dec 14, 2013, 07:11 PM IST