‘काँग्रेस’चा हात ‘आम आदमी पक्षा’ला साथ!
दिल्लीत काँग्रेसनं आम आदमी पार्टीला पाठिंबा दिलाय. दिल्लीच्या नायब राज्यपालांना याबाबतचं पत्र काँग्रेसनं आज रात्री सादर केलं.
Dec 13, 2013, 10:02 PM IST`आप`वाल्यांच्या गोंधळानं अण्णा भडकले!
आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी राळेगणमध्ये हंगामा केला... कालचा दिवस कुमार विश्वास यांच्या आरोपांमुळं गाजला, तर आज गोपाळ राय यांनी धिंगाणा केला... अखेर अण्णा हजारेंनीच कान उपटल्यानंतर आपच्या नेत्यांना बेआबरू होऊन राळेगणमधून काढता पाय घ्यावा लागला.
Dec 13, 2013, 07:09 PM ISTदिल्लीत सरकार बनविण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करणार ‘आप’
देशाची राजधानी दिल्लीत सरकार बनविण्यासंदर्भातल्या आपल्या भूमिकेबाबत आता आम आदमी पक्ष थोडा नरमलेला दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार आता ‘आप’ दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे. पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांच्या घरी ‘आप’ची बैठक सुरु आहे. ज्यात पहिल्यांदाच दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या पर्यायांबाबत आपण विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय.
Dec 13, 2013, 03:56 PM IST‘आप’ आणि ‘भाजप’नं एकत्र यावं- किरण बेदी
दिल्लीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टी सत्ता स्थापण्या ऐवजी विरोधी बाकांवर बसण्यास पसंती देत असताना किरण बेदींनी मात्र दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची सूचना केलीय.
Dec 9, 2013, 02:52 PM ISTदिल्लीवर सत्ता कोणाची? पेच वाढला, पुन्हा निवडणूक?
दिल्लीतला राजकीय पेच वाढतच चाललाय... सत्ता स्थापन करण्यासाठी कुठल्याही परिस्थिती काँग्रेस किंवा भाजपची मदत घेणार नसल्याचं आम आदमी पार्टीनं स्पष्ट केलंय. दिल्लीनं आम आदमी पार्टीला विरोधात बसण्याचा कौल दिलाय. त्यामुळं आम्ही विरोधात बसू असंही पक्षाचं म्हणणंय. प्रसंगी पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारीही आम आदमी पार्टीनं दर्शवलीय.
Dec 9, 2013, 12:49 PM IST‘पहले आप, पहले आप’मध्ये सत्ता कोणाची?
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीमुळं काँग्रेसचा पुरता सफाया झाला... आम आदमी पार्टीनं आपल्या पहिल्याच निवडणुकीत २८ जागा पटकावल्या... तर १५ वर्षांपूर्वी दिल्लीत सत्ता गमावलेल्या भाजपनं ३१ जागा मिळवल्या... मात्र एवढ्या जागा मिळवूनही भाजपला बहूमतासाठी आणखी ५ जागांची गरज आहे...
Dec 9, 2013, 09:45 AM IST`आप` म्हणजे `झोळीवाल्यांची नवी फौज`, शरद पवारांचा टोला
विधानसभा निवडणुकांच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया आलीय. ‘आप’च्या विजयावर त्यांनी उपरोधिक टोला लावत `झोळीवाल्यांच्या नव्या फौजा` असं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेबसाईटवर शरद पवारांनी आपली ही प्रतिक्रिया दिलीय.
Dec 9, 2013, 09:29 AM ISTसिंचन घोटाळा उघडकीस आणणारे विजय पांढरे ‘आप’मध्ये!
सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे राजकारणात एंट्री मारणार आहेत.. लवकरच ते आम आदमी पक्षात प्रवेश करणार आहेत..
Nov 23, 2013, 10:25 AM ISTयोगेंद्र यादव यांचं यूजीसीचं सदस्यत्व रद्द
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं सदस्यत्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना महाग पडलंय. आम आदमी पक्षाचे सदस्य झाल्यामुळं योगेंद्र यादव यांचं विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीमधलं पद यूजीसीनं रद्द केलंय.
Sep 19, 2013, 10:16 AM IST