...आणि ‘आप’चे मंत्री विधानसभेत पोहोचले रिक्षानं

दिल्ली विधानसभा अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी आम आदमी पार्टीचे सर्वच नवनियुक्त आमदार विधानसभेत पोहचले. कोणत्याही सरकारी सुविधेचा वापर न करण्याचा निर्धार आपच्या आमदारांनी केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 1, 2014, 06:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी आम आदमी पार्टीचे सर्वच नवनियुक्त आमदार विधानसभेत पोहचले. कोणत्याही सरकारी सुविधेचा वापर न करण्याचा निर्धार आपच्या आमदारांनी केलाय.
त्यानुसार आपचे आमदार राजेश गर्ग हे आपल्या रिक्षानं विधानसभेत पोहचले. त्यांना सुरूवातीला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र वाहन विधानसभेत आणण्यासंदर्भात कोणताही कायदा नसल्यानं गर्ग यांना अखेर परवानगी देण्यात आली.
आम आदमी पार्टीला उद्यापर्यंत बहुमत सिद्ध करायचे आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.