‘आप’नं फेटाळला ‘स्वाभिमानी’चा प्रस्ताव!

शेतकऱ्यांसंदर्भातल्या आमच्या अटी मान्य केल्या तर ‘आप’सोबत आघाडी करणार असल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं होतं. मात्र अटींवर आधारीत राजकारण ‘आप’च्या तत्वात बसत नसल्याचं सांगून राजू शेट्टींचा सशर्थ आघाडीचा प्रस्ताव आम आदमी पार्टीनं फेटाळून लावलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 1, 2014, 07:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
शेतकऱ्यांसंदर्भातल्या आमच्या अटी मान्य केल्या तर ‘आप’सोबत आघाडी करणार असल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं होतं. मात्र अटींवर आधारीत राजकारण ‘आप’च्या तत्वात बसत नसल्याचं सांगून राजू शेट्टींचा सशर्थ आघाडीचा प्रस्ताव आम आदमी पार्टीनं फेटाळून लावलाय.
त्यामुळं राजू शेट्टी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ग्रामीण भागात मोठं जाळं आहे. तर ‘आप’चा शहरी भागांवर प्रभाव वाढू लागलाय. आपला ग्रामीण भागात शिरायचं असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी मदत होई शकते.
मात्र शेट्टींचा सशर्थ प्रस्ताव आपनं फेटाळून लावल्यानं ही आघाडी बनण्यापूर्वीच बिघडल्याचं चित्र दिसतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.