अमिताभ बच्चन

शेतकऱ्यांसाठी धावला अमिताभ

सामाजिक जाण असलेल्या सेलिब्रिटी व्यक्ती तशा जरा दुर्मिळच... आपला बीग बी अमिताभ बच्चन त्यापैकीच एक... स्टारडममुळे आपल्यातील संवेदनशीलता जराही कमी झालेली नाही, हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय.

May 13, 2012, 04:25 PM IST

बिग बी उपचारासाठी अमेरिकेला जाणार?

हिंदी चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन सध्या आजारपणाच्या वेगळ्याच वळणावर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती जरा नरम-गरम दिसते आहे. नुकतेच त्यांनी सिटी स्कॅन केल्यानंतर आता ते अधिक उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

May 2, 2012, 07:41 PM IST

अमिताभ,रेखा करणार सिलसिला पार्ट-२!

रुपेरी पडद्यावरील सुपरहिट जोडी अमिताभ आणि रेखा पुन्हा आपल्याला एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चांगली कथा असल्यास आम्ही दोघं एकत्र काम करू शकतो अशी तयारी स्वतः बिग बी यांनी दर्शविली आहे. त्यामुळे सिलसिला पार्ट-२ लवकरच येण्याची शक्यता वाढली आहे.

Apr 29, 2012, 12:14 PM IST

बिग बींच्या रेखा, सचिनला शुभेच्छा

अभिनेत्री रेखा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला राज्यसभेसाठी नामनियुक्त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही खासदारपदासाठी लायक असल्याचेही बिग बी यांनी म्हटले आहे

Apr 29, 2012, 11:07 AM IST

२५ वर्षांच्या वेदनांचा हिशेब अशक्य – बीग बी

गेल्या दोन दशकांपूर्वी देशाला हादरविणाऱ्या बोफोर्स प्रकरणात महानायक अभिताभ बच्चन यांना क्लिन चीट मिळाल्यानंतर नेहमी सत्याचा विजय होतो, हे स्पष्ट झाले असले तरी या कालावधीत कोणत्या परिस्थितीतून जावे लागले त्याची भरपाई करणे अशक्य असल्याची प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.

Apr 25, 2012, 07:13 PM IST

काँग्रेसला आता बोफोर्सचे ग्रहण

काँग्रेसच्‍या मानगुटीवर आता बोफोर्सचे भूत बसण्‍याची शक्‍यता आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या पदाचा वापर केल्याचा दावा स्वीडनचे माजी पोलिस अधिकारी स्टेन लिंडस्ट्रोम यांनी एका मुलाखतीत केला आहे. लिंडस्‍ट्रोम यांनी अमिताभ बच्‍चन यांना क्लीन चीट दिली आहे.

Apr 25, 2012, 04:16 PM IST

बिग बीला पुन्हा पोटदुखीचा त्रास

बिग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे.त्यामुळे मला लगेच सीटी स्कॅन करुन घ्यावे लागणार आहे. ही बातमी खुद्द बीग बी यांनी ट्विटरवर माहिती देताना दिली आहे.

Apr 10, 2012, 10:27 AM IST

ताऱ्यांची भेट : अमिताभ आणि रजनीकांत

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या उद्घाटनासाठी चेन्नई येथे गेले असता, त्यांनी दक्षिणेचे मेगास्टार ‘रजनीकांत’ यांची भेट घेतली.. रजनीकांत यांची तब्येत बरी झालेली पाहून अमिताभ यांनी आनंद व्यक्त केला.

Apr 4, 2012, 03:21 PM IST

अमिताभ हा एकमेव सुपरस्टार- रजनीकांत

अमिताभ बच्चन हा एकमेव सुपस्टार आहे हे विधान दुसऱ्या तिसऱ्या कुणी केलं नसून खुद्द ऑल टाईम ग्रेट रजनीकांतनं केलं आहे. रजनीकांतच्या यशोगाथेने अनेक विक्रमांची नोंद केली असली आणि त्याचे चाहते जगभरात पसरले असले तरीही त्याला अमिताभ हा एकमेव सुपरस्टार आहे असं वाटतं. रजनीकांत कोचादियाँ या त्याच्या आगामी सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी लंडनमध्ये आहे.

Apr 2, 2012, 07:55 AM IST

कतरिना करणार अमिताभबरोबर रोमान्स?

निखिल अडवाणीच्या आगामी ‘मेहरुन्निसा’ या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या नायिकेच्या भूमिकेत कतरिना कैफ दिसण्याची शक्यता आहे. या आगळ्यावेगळ्या सिनेमात कतरिनाला अमिताभ बच्चन यांच्याशी रोमान्स करायचा आहे.

Mar 20, 2012, 10:42 AM IST

ऐश्वर्या-अभिषेकची बेटी 'आराध्या'?

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन प्रेगंट असल्यापासून बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी कोण येणार, बेटी की बेटा? याचीच चर्चा होती. ऐश्वर्याला मुलगी झाल्याची बातमी छोटा बच्चन अभिषेकने ट्विट केल्यानंतर मीडियाला समजली. त्यानंतर लगेच चर्चा सुरू झाली ती नावाची. त्यासाठी अभिषेकने नावे सुचविण्याचे आवाहनही केलं होतं, त्यामुळे बेटीचे नाव काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचीली होती. मात्र, ही उत्सुकता आता संपली आहे. कारण बिग बीच्या नातीचे नाव आहे, आराध्या.

Mar 14, 2012, 11:58 AM IST

बिग बींना मिळाला ‘डिस्चार्ज’!

'अखेर सुटका होणार...' असे बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी काल रात्री मायक्रो ब्लॉगिंग साइटवर ट्विटरवर ट्विट केले होते. अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमधून सुटका होण्याची वाट पाहत होते. त्यांची इच्छा अखेर पूर्ण झाली.

Feb 23, 2012, 09:56 PM IST

बिग बी अमिताभ पुन्हा रुग्णालयात

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर दोन दिवसापूर्वी डिसचार्ज दिला होता. मात्र, नवीच दुखणी निदर्शनास आल्यामुळे, हॉस्पिटलमधील त्यांचा मुक्काम वाढणार आहे.

Feb 16, 2012, 08:20 PM IST

बिग बी यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळणार

बिग बी यांना आज रुग्णालयातुन घरी सोडण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. अमिताभ बच्चन यांना शनिवारी मुंबईतील अंधेरीच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं

Feb 13, 2012, 01:46 PM IST

अमिताभ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

हिंदी चित्रपट सृष्टीतील बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर आज यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबतची माहिती त्यांच्या डॉक्टरांनी दिली. अमिताभ (६९) गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत.

Feb 11, 2012, 04:07 PM IST