www.24taas.com, वर्धा
सामाजिक जाण असलेल्या सेलिब्रिटी व्यक्ती तशा जरा दुर्मिळच... आपला बीग बी अमिताभ बच्चन त्यापैकीच एक... स्टारडममुळे आपल्यातील संवेदनशीलता जराही कमी झालेली नाही, हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय.
दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अमिताभनं दिलासा दिलाय. वर्ध्यातल्या ११४ शेतकऱ्यांना अमिताभ बच्चन यांच्या पुढाकारानं रोटरी क्लबनं २९ लाख रुपयांची मदत दिली आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडून झालेल्या या मदतीमुळे या कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जातून मुक्ती मिळणार आहे.
रोटरी क्लबच्या वतीने वर्धा जिल्ह्यात गेली दोन वर्ष बँकांकडून कर्जबाजारी शेतकऱ्यांची शोध मोहीम राबविण्यात आली. त्यातून मदतीची आवश्यकता असणाऱ्या ११४ कर्जबाजारी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. या कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबरोबरच एका वर्षाचं स्वास्थ्य विमा कार्डही देण्यात आलं. दुष्काळानं त्रासलेल्या शेतकऱ्यांना अमिताभच्या या मदतीनं चांगलाच दिलासा मिळाला आहे.
व्हिडिओ पाहा :
[jwplayer mediaid="100181"]