अमिताभ,रेखा करणार सिलसिला पार्ट-२!

रुपेरी पडद्यावरील सुपरहिट जोडी अमिताभ आणि रेखा पुन्हा आपल्याला एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चांगली कथा असल्यास आम्ही दोघं एकत्र काम करू शकतो अशी तयारी स्वतः बिग बी यांनी दर्शविली आहे. त्यामुळे सिलसिला पार्ट-२ लवकरच येण्याची शक्यता वाढली आहे.

Updated: Apr 29, 2012, 12:14 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

रुपेरी पडद्यावरील सुपरहिट जोडी अमिताभ आणि रेखा पुन्हा आपल्याला एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चांगली कथा असल्यास आम्ही दोघं एकत्र काम करू शकतो अशी तयारी स्वतः बिग बी यांनी दर्शविली आहे. त्यामुळे सिलसिला पार्ट-२ लवकरच येण्याची शक्यता वाढली आहे.

 

 

बिग बी यांनी सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘डिपार्टमेंट’साठी कंबर कसली असून त्याच्या प्रमोशनच्या वेळी बिग बींनी रेखा आणि सचिनचे अभिनंदन केले. दोन्ही खासदारपदासाठी लायक असल्याचेही बिग बी यांनी म्हटले आहे.

 

 

पुन्हा चंदेरी पडद्यावर रेखा समवेत काम करण्यात मला कोणतीही अडचण नसल्याचे बिग बी यांनी स्पष्ट केले आहे. एखादी चांगली कथा असली तर आम्ही दोघं एकत्र काम करू शकतो.

 

 

संसदेच्या प्रत्येक सत्रात राष्ट्रपती कला आणि चित्रपट जगतातील काही व्यक्तींचे नाव राज्यसभेसाठी देतात. हे सन्मानाचे पद आहे. यासाठी ज्यांची पण निवड झाली ते त्यासाठी लायक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मला आठवते की, अभिनेत्री नर्गिसही या पदासाठी निवडण्यात आल्या होत्या.