IPL 2023 : 'कोणी 2BHK चं घर देतं का?', RCB च्या सामन्यात तरुणाची निंजा टेक्निक; खेळाडूंऐवजी त्याचीच चर्चा

IPL 2023 : आयपीएलच्या सामन्यात दर दिवसी काही नवे किस्से घडतच असतात. कधी एखादा खेळाडू चर्चेत येतो तर, कधी काही दुसराच मुद्दा लक्ष वेधतो. अशाच एका सामन्यात चक्क एका तरुणावर सर्वांच्याच नजरा खिळल्या.   

Updated: Apr 19, 2023, 10:38 AM IST
IPL 2023 : 'कोणी 2BHK चं घर देतं का?', RCB च्या सामन्यात तरुणाची निंजा टेक्निक; खेळाडूंऐवजी त्याचीच चर्चा  title=
(छाया सौजन्य- @BoseAtin/ ट्विटर) | youth saying Looking for 2BHK home during rcb match in Bengaluru goes viral see photo

IPL 2023 : काही वर्षांपूर्वी अमुक एका वयात आल्यावर घर, तमुक वयात आल्यावर भटकंती असेच काहीसे बेत तरुणाई आखत होती. पण, आता मात्र या संकल्पना आणि त्याहून ही आखणी काहीशी बदलली आहे. आता अनेकांचं प्राधान्य घराला असतं, तर असे अनेकजण आहेत जे आजही घरावर पैसे खर्च करण्यापेक्षा मनसोक्त फिरण्याला, आवडीनिवडी पूर्ण करण्याला प्राधान्य देतात. अर्थात हा ज्याचात्याचा प्रश्न. राहिला प्रश्न घराचा, तर ती एक महत्त्वाची गरज. मनाजोगं घर (dream home) मिळवणं हे वाटतं तितकं सोपं नाही. पण, ते अगदीच कठीणही नाही. कारण तुम्ही मार्ग शोधाल, तरच काहीतरी उपाय निघेल नाही का? 

तरुणानं लढवली अनोखी शक्कल 

सहसा घर घ्यायचंय, हे स्वप्न सत्यात उतरवण्याचे प्रयत्न जेव्हा जेव्हा सुरु होतात तेव्हा पहिली धाव मारली जाते Agent कडे, किंवा मग सोशल मीडियावरील अनेक Websites ची मदत इथं घेतली जाते. पण, बंगळुरूमध्ये एका तरुणानं भलतीच शक्कल लढवत घर मिळवण्याचा प्रयत्न केला. (youth saying Looking for 2BHK home during rcb match in  Bengaluru goes viral see photo )

भारताची सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley) अशी ओळख असणाऱ्या आणि IT क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचं हक्काचं ठिकाण असणाऱ्या बंगळुरू येथे नुकताच आरसीबी अर्थात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचा सामना पार पडला. यावेळी बऱ्याच क्रिकेटप्रेमींनी हातात बॅनर घेत आपल्या आवडीच्या संघांना पाठींबा दिल्याचं पाहायला मिळालं. त्यातल्याच एका फलकानं आणि तो फलक धरलेल्या तरुणानं सर्वांच्या नजरा वळवल्या. 

Atin Bose या ट्विटर (twitter) युजरनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून या क्षणांचा फोटो पोस्ट केला. जिथं तो घराच्या शोधाचा मुद्दा आयपीएल सामन्यादरम्यान उचलून धरताना दिसला. “Looking for a 2BHK in Indiranagar” असं त्याच्या हातात असणाऱ्या फलकावर लिहिण्यात आलं होतं. 

हेसुद्धा वाचा : IPL 2023 : अर्जुनने विकेट घेताच रोहित शर्माची लाखात एक प्रतिक्रिया, Video पाहाच

 

बरं हा फोटो शेअर करत असताना त्यानं ट्विटमध्ये लिहिलं, 'आम्ही तर कोहलीला आमच्याशी लग्न करायलापण सांगितलं असतं, पण सध्या हेच प्राधान्यस्थानी...'. या तरुणांची कल्पनाशक्ती आणि सोबतच विनोदबुद्धी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. 

घर हवं... तेही मनाजोग्या परिसरात! 

तरुणांच्या फलकावर दिसत आहे, की ते इंद्रनगर या भागात घराच्या शोधात आहेत. हा एक असा परिसर आहे, जिथं घरांचे दर आणि घरभाड्यांचे दर गगनाला भिडले आहेत. शिवाय इथं सहजासहजी घरंही उपलब्ध नाहीत. किंबहुना भाड्यानं घर मिळाल्यास इथं भाड्याच्या रकमेनुसार 4 ते 8 लाख डिपॉझिट रक्कमही भरावी लागतेय, म्हणजे आता घरभाडं किती असेल याचा विचार करा. 

असो, या तरुणानं केलेल्या प्रयत्नांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली. आता आयपीएलच्या निमित्तानं त्यांच्या घराची शोधमोहिम थांबली, तर IPL पावलं असंच म्हणावं लागेल, नाही का?