IPL 2023 : अर्जुनने विकेट घेताच रोहित शर्माची लाखात एक प्रतिक्रिया, Video पाहाच

IPL 2023, SRH vs MI:  आयपीएलच्या 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा 14 धावांनी विजय झाला. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 19, 2023, 09:21 AM IST
IPL 2023 : अर्जुनने विकेट घेताच रोहित शर्माची लाखात एक प्रतिक्रिया, Video पाहाच  title=
Rohit Sharma impressed Arjun Tendulkar

Rohit Sharma impressed Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये (IPL 2023) मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद (SRH vs MI) विरुद्धचा सामन्यात काल (18 एप्रिल 2023) दमदार विजय मिळवला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादचा 14 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने जिंकून हॅटट्रिक केली आहे. या सामन्यादरम्यान महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने गोलंदाजीची सुरुवात अन् शेवट पाहून अर्जुन अपेक्षांवर खरा उतरला. अर्जुनची खेळी पाहून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma)लाखात एक प्रतिक्रीया दिली. नेमकं रोहित शर्मा अर्जुनवर काय प्रतिक्रीया दिली आहे ते पाहूया...

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सने (SRH vs MI) प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 192 धावा केल्या. विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी सनरायझर्सचा संघ 19.5 षटकांत सर्वबाद करुन रोहित शर्माच्या संघाने 14 धावांनी विजय मिळवला. आयपीएल 2023 मधील मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा विजय आहे. विजयाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आनंदी दिसत होता. यावेळी त्याने संघाच्या फलंदाजीसह अर्जुन तेंडुलकरचे (Arjun Tendulkar) कौतुक केले.

रोहितने अर्जुनला मारली मिठी अन्... 

या सामन्याच्या विजयानंतर रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरचे (Rohit Sharma impressed Arjun Tendulkar) प्रचंड कौतुक केले. 'अर्जुनसोबत खेळणे खूप रोमांचक आहे. अर्जुन गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मी त्याला मोठे होताना पाहिले आहे. अर्जुनला आता समजले की त्याला काय करायचे आहे. ब्राउनला खात्री आहे की तो हे करू शकतो. अर्जुन नव्या चेंडूने स्विंग करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय तो स्लॉग ओव्हर्समध्ये यॉर्कर बॉल टाकत आहे.  मध्यमगती गोलंदाज अर्जुनने आपला दुसरा आयपीएल सामना खेळत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दबावाच्या परिस्थितीत शेवटच्या षटकात 20 धावा वाचवत विकेट घेतली आणि मुंबईला सलग तिसऱ्या विजयात मोलाची भूमिका बजावली. 

रोहित शर्माने शेवटचा षटकार मोठ्या विश्वासाने अर्जुनला दिला आणि त्याने अप्रतिम यॉर्कर मारून हैदराबादच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. पहिले दोन यॉर्कर त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर फेकले. नंतर काही चेंडू बंध्यात म्हणजेच फलंदाजाच्या पायावर टाकले अन् पाचव्या चेंडूवर अर्जुनला आयपीएलमधील पहिली विकेट मिळाली. त्याने भुवनेश्वर कुमारला बाद करुन हैदराबादचा डाव 178 धावांवर गुंडळला. अर्जुनने पहिल्या सामन्यात 2/17 धावा केल्या आणि आज त्याने 2.5/18 धावा करून एक विकेट घेतली. अर्जुनने विकेट घेतल्यावर रोहितला खूप आनंद झाला आणि त्याने अर्जुनला मिठाई मारली. 

असे काही खेळाडू आहेत जे यापूर्वी आयपीएल खेळलेले नाहीत...

रोहित शर्मा स्वत:च्या फलंदाजीवर म्हणाला, 'हैदराबादमध्ये खेळताना माझ्या चांगल्या आठवणी आहेत. मी येथे तीन हंगाम खेळलो आणि एक ट्रॉफी जिंकली. गोलंदाजांना संघटित करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आमच्याकडे असे काही खेळाडू आहेत जे यापूर्वी आयपीएल खेळलेले नाहीत, त्यांना सपोर्ट करणे महत्त्वाचे आहे. मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत आहे. मी जे करतो ते मला आवडतं.. आपल्यापैकी एकाला शेवटपर्यंत फलंदाजी करायची आहे. पण जोपर्यंत आम्ही मोठी धावसंख्या करत आहोत तोपर्यंत आम्ही आनंदी आहोत. आमच्याकडे भक्कम फलंदाजी आहे आणि आमच्या फलंदाजांनी निर्भयपणे फलंदाजी केली पाहिजे याची आम्हाला काळजी घ्यावी लागेल.