Success Story : कधी काळी मुंबईत पाणीपुरी विकायचा, आता टीम इंडियाचा सदस्य होणार?

Yashasvi Jaiswal Success Story : वडील छोटे दुकानदार, मुलगा मुंबईत एकेकाळी पाणीपुरी विकायचा, डेअरीमध्ये राहिला आता तो आयपीएलचा सुपरस्टारची यशस्वी कहाणी आता...  

नेहा चौधरी | Updated: May 4, 2023, 05:07 PM IST
Success Story : कधी काळी मुंबईत पाणीपुरी विकायचा, आता टीम इंडियाचा सदस्य होणार? title=
yashasvi jaiswal Once open time selling Panipuri in Mumbai now will be a member of Team India ipl Success Story in marathi

Yashasvi Jaiswal Success Story : आयपीएलमध्ये मुंबई विरोधात शतकी खेळी खेळणारा यशस्वी जयस्वालची सर्वत्र चर्चा होतेय. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना खेळला जाता होता. या उपांत्य सामन्यात पाकने भारताने 172 धावांचं लक्ष्य दिलं. भारताने हे लक्ष्य 35.2 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. त्यानंतर एक नाव सगळ्या जगात गाजलं ते म्हणजे यशस्वी जैसवाल. 

या मुलाने पुन्हा एकदा क्रीडा विश्वात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आयपीएलमध्ये रविवारी 30 एप्रिल 2023 ला मुंबई इंडियन्सविरुद्धात शतकी खेळी करत स्टार क्रिकेटर म्हणून समोर येतं आहे. या स्टार खेळाडूला टीम इंडियामध्ये स्थान मिळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. (yashasvi jaiswal Once open time selling Panipuri in Mumbai now will be a member of Team India ipl Success Story in marathi)

या यशस्वी खेळाडूची यशाची कहाणीही तेवढीच संघर्षमय आहे. यशस्वीने लहानपणापासून क्रिकेटचं वेड असल्याने घर सोडलं आणि मुंबईत आला. आझाद मैदानात त्याने अनेक रात्र काढल्या. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने पाणीपुरी विकली. 

क्रिकेटचा वेडा

28 डिसेंबर 2001 ला यूपीमधील भदोहीमध्ये गरीब कुटुंबात जन्म झाला. वडिलांचं छोटेसं दुकान होतं. लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड पण गावात कोचिंग सेंटर नाही आणि बाहेरगावी पाठवायला पैसा नाही. क्रिकेटसाठी मुंबईत जाण्याचा हट्ट त्याने धरला. अखेर आई वडिलांनी मुंबईला नातेवाईकांकडे पाठवलं. पण गरिबीमुळे तो नातेवाईकांकडे जास्त वेळ राहू शकला नाही. नातेवाईकांच्या छोट्याशा खोलीत झोपायला जायला देखील जागा नव्हती. अखरे मुंबईतील काळबादेवीमधील एका डेअरीमध्ये तो दिवस काढू लागला. 

पण इथे राहायला पण त्याला मजुरी करावी लागणार होती. अखेर तो मजूर काम करायला लागला. दिवसभर क्रिकेट खेळायचा आणि रात्री गाढ झोपी जायचा. मग काम कधी करणार? एका वेळी तर त्याला आझाद मैदानात झोपण्याची वेळ आली. मुस्लीम युनायटेड क्लबमध्ये ग्राऊंड मॅनसोबत ततो राहत होता. वडील कसे बसे वेळोवेळी पैसे पाठवत होते पण ते मुंबईसारखा शहरात पुरायचे नाही. कुटुंबाला वाटायचं मुलगा नातेवाईकांसोबत राहतो त्याला कशाला हवे एवढे पैसे. 

यशस्वीने आपल्या संघर्षाबद्दल घरी सांगितलं नव्हतं. कारण खूप प्रयत्नानंतर आणि जिद्दीने तो मुंबईत आला होता. जर घरच्यांना हे कळलं तर त्याला घरी परत बोलवले जाईल. मुंबईत जगायचं तर आहे, मग पोटासाठी यशस्वीने पाणीपुरी विकण्यास सुरुवात केली. या क्रिकेटवेडाचा संघर्ष सुरु होता. 2013 मध्ये तो दिवस उजाडला प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी हा हिरा हेरला. त्याला क्रिकेटच्या ABCD चे धडे देण्यात आले. याचा प्रशिक्षणाची परीक्षेचा दिवस आला 2014 मध्ये यशस्वी गिल्स शील्ड शाळेतून त्याला खेळण्याची संधी मिळाली. 

राजा शिवाजी विद्यामंदिर विरुद्धात या पठ्ठाने नाबाद 319 खेळी खेळी आणि 99 रन्समध्ये त्याने 13 खेळांची दांडी गुल केली. अखेरला मुंबईत संघात निवडलं गेलं. 2019 मधील विजय हजारे करंडक बंगळुरूमध्ये मुंबई आणि झारखंड यांच्यात सामना झाला. त्यावेळी मुंबईने 358 रन्स काढले. त्यातील 203 रन्स हे यशस्वीचे होते. 17 वर्षी यशस्वी लिस्ट (देशांतर्गत एकदिवसीय) क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला. 

असा सुरु झाला यशस्वीचा प्रवास...2020 च्या भारतीय अंडर-19 संघात त्याची निवड झाली. तिथेही त्याचा बल्लाने कमाल केलं. पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडूचा मान त्याने पटकावला. 19 वर्षांखालील विश्वचषकातही त्याने चमकदार कामगिरी केली.  2020 च्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला 2.40 कोटीमध्ये आपल्या संघात घेतलं. आयपीएलमध्ये त्याचा खेळाची झलक सगळ्यांना पाहिला मिळाली.  यशस्वीने 32 सामन्यात 145 च्या स्ट्राईक रेटने  975 रन्स केले. यामध्ये सहा अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश होता. 

त्याची आतापर्यंतची कामगिरी पाहता तो लवकरच भारतीय संघातून खेळ याच काही शंका नाही.