Rohit Sharma : 3 बॉल 3 सिक्स...; राजस्थानविरूद्ध रोहितने केली फिक्सिंग? फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

Rohit Sharma : डेविडने ओव्हरच्या तिन्ही बॉल्सवर उतुंग सिक्स लगावले. मात्र याचनंतर मोठा वाद निर्माण झाला आणि रोहित शर्मावर चिटींगचा आरोप लावला गेला. यावेळी चाहत्यांनी रोहितने फिक्सिंग केला असल्याचं म्हटलंय. 

सुरभि जगदीश | Updated: May 1, 2023, 04:32 PM IST
Rohit Sharma : 3 बॉल 3 सिक्स...; राजस्थानविरूद्ध रोहितने केली फिक्सिंग? फोटो व्हायरल झाल्याने खळबळ title=

Rohit Sharma : रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगला होता. हा सामना जिंकून मुंबईच्या टीमने कर्णधार रोहित शर्माला (Rohit sharma) मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबईच्या टीमने राजस्थानच्या टीमचा 6 विकेट्सने पराभव केला. मात्र हा सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रोहित शर्मावर फिक्सिंगचा (Rohit Sharma Fixing) आरोप केला जातोय. हा संपूर्ण वाद निर्माण झाला तो टीम डेविडने (Tim David) मारलेल्या शेवटच्या 3 सिक्समुळे. 

मुंबई इंडियन्सला रविवारच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 17 रन्सची गरज होती. यावेळी क्रिझवर टीम डेविड फलंदाजी करत होता. तर गोलंदाजीची धुरा जेसन होल्डरकडे होती. यावेळी डेविडने ओव्हरच्या तिन्ही बॉल्सवर उतुंग सिक्स लगावले. मात्र याचनंतर मोठा वाद निर्माण झाला आणि रोहित शर्मावर चिटींगचा आरोप लावला गेला. यावेळी चाहत्यांनी रोहितने फिक्सिंग केला असल्याचं म्हटलंय. 

रोहितवर का होतोय चिटींगचा आरोप?

मुंबई इंडियन्सकडून रविवारच्या सामन्याचा खरा हिरो ठरला तो म्हणजे, सूर्यकुमार यादव. या सामन्यात सूर्यकुमारने उत्तम फलंदाजी करत 29 बॉल्समध्ये 55 रन्सची खेळी केली. मात्र सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर राजस्थानचं पारडं जड होताना दिसलं. यावेळी शेवटच्या ओव्हरमध्ये 17 रन्स हवे असताना टीमने लागोपाठ 3 बॉल्सवर सिक्स लगावल्या. 

मात्र यावेळी कॅमेरात एक गोष्ट कैद झाली, ती म्हणजे रोहित शर्मा अंपायरशी बोलत होता. यावेळी रोहित शर्मा अंपायरने काहीतरी समजवताना दिसतंय. मात्र यावेळी सोशल मीडियावर युझर्सने तो अंपायरला जिंकण्यासाठी पैसे देत असल्याचं म्हटलंय. तर काही युझर्सने रोहितवर फिक्सिंगचा आरोप केला आहे.

मुंबई इंडियन्सचा विजय

रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर रॉयल्सने 212 रन्सची केले. दरम्यान या लक्ष्याचा पाठलाग करताना बर्थडे बॉय रोहित शर्माला कमाल दाखवता आली नाही. मात्र सूर्यकुमार यादव, ग्रीन आणि टीम डेविड यांच्या खेळीच्या जोरावर हे मुंबईने विजय मिळवला आहे. 

जयस्वालची यशस्वी खेळी

रविवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध झालेल्या सामन्यात यशस्वी जयस्वालने शतकी खेळी केली. राजस्थानकडून ओपनिंगला आलेल्या यशस्‍वीने अवघ्या 62 बॉल्समध्ये 124 रन्सची दमदार खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 16 फोर आणि 8 सिक्सेचा समावेश होता. त्याच्या या शतकामुळे टीमला 200 रन्सचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली.