AFG vs SL: अवघ्या काही तासांमध्ये भारतात आयसीसी वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यापूर्वी वॉर्मअप सामने खेळवण्यात येत आहे. असंच मंगळवारी श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात वॉर्म अप मॅच खेळवली गेली. दरम्यान या सामन्यामध्ये अफगाणिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला आहे. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, अफगाणिस्तानचा विजय झाला आहे.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 10 गडी गमावून 294 रन्स केले. यावेळी दुसऱ्या डावात या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 20.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 118 रन्स केले. या सामन्यात पावसाचा खेळ झाला आणि सामना थांबवण्यात आला.
दरम्यान पाऊस थांबल्यावर सामना 8 ओव्हर्स कमी करून 42 ओव्हर्सचा करण्यात आला. अफगाणिस्तानला विजयासाठी 257 रन्सचं लक्ष्य मिळाले. त्यानंतर अफगाणिस्तानला विजयासाठी 135 रन्सची गरज होती. यावेळी अफगाणिस्तानने 6 विकेट्स गमावून लक्ष्य पूर्ण केले.
या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 10 विकेट्स गमावून 294 रन्स केल्या. पावसामुळे अफगाणिस्तानला विजयासाठी 42 ओव्हर्समध्ये 257 रन्सचं लक्ष्य मिळालं. जे अफगाणिस्तानने 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
अफगाणिस्ताचे रहमानउल्ला गुरबाज आणि रहमत शाह यांच्यामध्ये १९४ रन्सची पार्टनरशिप झाली. दोन्ही खेळाडूंनी शानदार फलंदाजी करत टीमला मजबूत स्थितीत आणले. गुरबाजने 119* आणि रहमत 93* रन्सची खेळी खेळली. त्यामुळे अफगाणिस्तानला सहज विजय मिळाला. दरम्यान अफगाणिस्तान विजयाच्या उंबरठ्यावर असताना दोघंही फलंदाज retired out आहे.
सराव सामन्यात (AFG vs SL) अफगाणिस्तानविरुद्ध फिरकी गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. श्रीलंकेचा डाव 294 धावांवर आटोपला. ज्यामध्ये सर्वाधिक विकेट स्पिनर्सच्या गोलंदाजीवर पडल्या. मोहम्मद नबीच्या फिरकीपुढे श्रीलंकाचे फलंदाज ढेपाळले. ज्याने 4 विकेट्स घेऊन कोणत्याही फलंदाजांमध्ये मोठी पार्टनरशिप होऊ दिली नाही. तर राशिद खान, नूर अहमद यांनी 1-1 विकेट घेतली.