World Cup 2023 : सचिन तेंडूलकरच्या शिरपेचात मानाचा तुरा, वर्ल्ड कपच्या तोंडावर ICC ने केली मोठी घोषणा!

Sachin Tendulkar as Global Ambassador : इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG विरुद्ध NZ) यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी आयसीसीने (ICC announced) मोठी घोषणा केली.

Updated: Oct 3, 2023, 11:45 PM IST
World Cup 2023 : सचिन तेंडूलकरच्या शिरपेचात मानाचा तुरा, वर्ल्ड कपच्या तोंडावर ICC ने केली मोठी घोषणा!  title=
Sachin Tendulkar, Global Ambassador, Cricket World Cup

ICC ODI Cricket World Cup 2023 : उद्यापासून क्रिकेटच्या वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. अशातच आता आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) याची वर्ल्ड कपसाठी जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी याची घोषणा केलीये. सचिनने आपल्या कारकिर्दीत भारताकडून सहा वेळा एकदिवसीय विश्वचषक खेळला आहे आणि यंदाचा वर्ल्ड कप देखील इथंच खेळवला जाणार असल्याने सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलेला दिसणार आहे.

सचिन तेंडुलकर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील उद्घाटन सामन्यापूर्वी विश्वचषक ट्रॉफीसह बाहेर पडेल आणि स्पर्धेचे उद्घाटन झालं असें घोषित करेल, असं आयसीसीकडून सांगण्यात आलंय. आतापर्यंतच्या क्रिकेट विश्वचषकात आयसीसीचे राजदूत म्हणून वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी देखील भूमिका पार पाडली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच, श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांना देखील आयसीसीने मानाचं स्थान दिलं होतं.

2011 साली वर्ल्ड कप भारतात खेळवला गेला होता. मात्र, सचिन तेंडूलकर त्यावेळी टीम इंडियामध्ये खेळत होता. आता 12 वर्षानंतर भारतात वर्ल्ड कप खेळवला जातोय. त्यानिमित्ताने सचिनला जागतिक राजदूत म्हणून घोषित करण्यात आलंय.

आणखी वाचा - PAK vs AUS : वॉर्नरच्या डोक्यातून 'पुष्पा'चा फिवर उतरेना, LIVE सामन्यात असं काही केलं की...

दरम्यान, यंदा विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा (Openign Ceremony) होणार नाही. स्पर्धेच्या एक दिवस आधी म्हणजे 4 ऑक्टोबरला भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता मिळालेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघांचे कर्णधार एकमेकांना भेटतील आणि फोटो सेशन फक्त (Photo Session) होईल. समोर आलेल्या माहितीनुसार, उद्घाटन सोहळ्याऐवजी स्पर्धेचा सांगता समारोह भव्य करण्याचा बीसीसीायचा विचार आहेत. 19 नोव्हेंबरला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.