India vs Bangladesh: काहीच दिवसांपूर्वी कसोटी मालिकेत 2-0 ने भारतीय टीमने बांगलादेशला पराभूत केल्यानंतर भारताची आता आजपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेवर आहे. T-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ प्रथमच आज (6 ऑक्टोबर) घरच्या मैदानावर खेळणार आहे. याशिवाय ग्वाल्हेरला १४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळाले आहे. या दोन गोष्टींमुळे हा सामना फारच खास असणार आहे. गेल्या वेळी या शहरात आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला होता. 2010 सचिन तेंडुलकर वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला होता.
ग्वाल्हेरमधील श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये आजचा सामना रंगणार आहे. त्यामुळे या मैदानावर बॅट आणि बॉलचा संघर्ष बघणे मनोरंजनक ठरणार आहे. बांगलादेश त्यांच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनच्या निवृत्तीनंतर प्रथमच कोणत्याही फॉरमॅटमध्ये मैदानात उतरणार आहे. याशिवाय या संघाकडे महमुदुल्लाह आणि मुस्तफिझूर रहमान यांचा अनुभव असेल.
श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम या नव्या स्टेडियमवर आजपर्यंत एकही प्रथम श्रेणी सामना खेळला गेला नाही. परंतु, या वर्षी मध्य प्रदेश प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात धावांचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील या सामन्यात उत्तम धावा होण्याची शक्यता आहे.
या आधी कानपुर कसोटीत झालेल्या बांगलादेश आणि भारताचा सामना पावसामुळे अडीच दिवस वाया गेला. परंतु रविवारी ग्वाल्हेरमध्ये हवामान पूर्णपणे स्वच्छ राहील आणि क्रिकेटसाठी अनुकूल असेल असा अंदाज आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या T20I सामन्याचे थेट प्रक्षेपण Sports18 नेटवर्कवर उपलब्ध असेल. याशिवाय या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वरही उपलब्ध असेल.
भारत आणि बांगलादेशचा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे.