David Warner: विकेटनंतर पव्हेलियनचा रस्ता चुकला वॉर्नर, ओमानच्या ड्रेसिंग रूममध्ये जातानाचा Video Viral

David Warner Oman Dressing Room Video: वर्ल्डकपच्या सामन्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या टीमने फलंदाजी केली. फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 164 रन्स केले. डेव्हिड वॉर्नरने ओपनिंग करताना 51 चेंडूत 56 रन्सची खेळी केली.

सुरभि जगदीश | Updated: Jun 6, 2024, 01:19 PM IST
David Warner: विकेटनंतर पव्हेलियनचा रस्ता चुकला वॉर्नर, ओमानच्या ड्रेसिंग रूममध्ये जातानाचा Video Viral title=

David Warner Oman Dressing Room Video: वर्ल्डकप टी-20 सामन्यात 10 वा सामना ऑस्ट्रेलिया विरूद्ध ओमान यांच्यामध्ये खेळवण्यात आला. बारबाडोसच्या केंसिंग्टन ओवलमध्ये झालेल्या सामन्या ऑस्ट्रेलियाने ओमानवर विजय मिळवला. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ओपनर खेळाडू डेव्हिड वॉर्नरसोबत एक विचित्र घटना घडलेली दिसली. यावेळी वॉर्नरची विकेट गेल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या नव्हे तर चुकीच्या ड्रेसिंग रूममध्ये जात असल्याचं कॅमेरात कैद झालं.  

डेव्हिड वॉर्नरचा व्हिडीओ व्हायरल

वर्ल्डकपच्या सामन्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या टीमने फलंदाजी केली. फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 164 रन्स केले. डेव्हिड वॉर्नरने ओपनिंग करताना 51 चेंडूत 56 रन्सची खेळी केली. ज्यामध्ये 6 फोर आणि 1 सिक्सचा होता. यावेळी ओमानचा गोलंदाज कलिलमुल्लाहच्या गोलंदाजीवर वॉर्नर आऊट झाला. यावेळी बाद झाल्यानंतर वॉर्नर ड्रेसिंग रूममध्ये जाऊ लागला आणि तिथेच तो नेमका चुकला.

यावेळी वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या नव्हे तर ओमानच्या ड्रेसिंग रूममध्ये जात होता. यावेळी त्याला कोणीतरी बोट दाखवून त्याची चूक लक्षात आणून दिली. यानंतर वॉर्नर ऑस्ट्रेलिया ड्रेसिंग रूममध्ये जाऊ लागला. दरम्यान वॉर्नरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

ओमानविरूद्ध स्टॉयनिसची तुफान फटकेबाजी

या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांकडून साजेसा खेळ झालेला दिसला नाही. एकेकाळी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढासळली होती. टीमने 3 विकेट 50 रन्सवर गमावल्या होत्या. यानंतर वॉर्नर आणि मार्कस स्टॉइनिस यांनी डाव सांभाळत टीमला चांगल्या स्कोरपर्यंत नेलं. या सामन्यात त्याची झंझावाती खेळी पाहायला मिळाली. या स्फोटक फलंदाजाने 186 च्या स्ट्राईक रेटने 36 बॉल्समध्ये नाबाद 67 रन्स केले. या खेळीत 6 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. 

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11

मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड. 

ओमानची प्लेईंग 11

आकिब इलियास (कर्णधार), कश्यप प्रजापती, प्रतीक आठवले, जीशान मकसूद, खालिद कैल, अयान खान, शोएब खान, मेहरान खान, शकील अहमद, कलीमुल्लाह, बिलाल खान.