भारताच्या विजयाने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आनंद

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संघर्ष असो वा क्रिकेटच्या मैदानावरील सामना...दोन्ही ठिकाणी तणाव हा असतोच. त्यामुळे या दोन देशांपैकी एखाद्या देशाने सामना जिंकल्याबद्दल दुसऱ्या देशाने त्यांना शुभेच्छा दिल्या असे कधी घडत नाही. 

Updated: Nov 3, 2017, 07:13 PM IST
भारताच्या विजयाने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आनंद title=

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संघर्ष असो वा क्रिकेटच्या मैदानावरील सामना...दोन्ही ठिकाणी तणाव हा असतोच. त्यामुळे या दोन देशांपैकी एखाद्या देशाने सामना जिंकल्याबद्दल दुसऱ्या देशाने त्यांना शुभेच्छा दिल्या असे कधी घडत नाही. 

मात्र भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर पाकिस्तानी चाहते आनंदले आणि त्यांनी भारताचे आभार मानलेत. 

भारताविरुद्धच्या पराभवामुळे टी-२० रँकिंगमध्ये न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानावर घसरण झालीये. तर पाकिस्तानचे रेटिंगमध्ये ३ गुण झाल्याने ते सामना न खेळताही अव्वल स्थानी पोहोचलेत. याच कारणामुळे पाकिस्तानी चाहते भारताच्या विजयाबद्दल खुश आहेत. 

आंतरराष्ट्रीय रँकिंगनुसार पाकिस्तान १२४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंड १२१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारत ११८ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.