Uddhav Thackerays: आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. मुंबईत झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेऊ असं सांगत कार्यकर्त्यांना ग्वाही दिलीय.. मात्र ठाकरेंच्या या वक्तव्याने मविआमध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय.
विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर मविआच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जातंय.. विधानसभेनंतर मविआच्या प्रमुख नेत्यांची एकत्र बैठकही झालेली नाहीय.. त्यातच
आगामी महापालिका निवडणुकीत शिवसैनिकांच्या मनासारखा निर्णय घेऊ अशा शब्दांत, अंधेरीतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिलेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची राज्यभरातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेऊ अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिलीय..
तिनही पक्षांचे नेते एकत्र बसून स्वबळासंदर्भात चर्चा करणार असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलीय. हमारी खामोशी को गलत मत समझ लेना असा शेर मारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर प्रतिक्रीया दिलीय..तर आम्ही मविआ टीकावी म्हणून प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.
एकटं लढण्याची भाषा म्हणजे मविआसोबत दगाबाजीला सुरुवात असल्याचं टीकास्त्र मंत्री आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर लगावलंय. तर उद्धव ठाकरेंची स्वबळाची भाषा ही हास्यास्पद असल्याची टीका प्रविण दरेकरांनी केलीय.
विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मविआतील तिन पक्षांची तोंडं तिन्हिकडे असल्याचं पाहायला मिळतंय.. लोकसभेतील विजयानंतर मविआ कायम राहिल असं छातीठोकपणे सांगितलं जातंय. मात्र विधानसभेनंतर चित्र बदललंय. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मविआ एकसंध राहते का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे.