USA ला मोठा धक्का, पाकिस्तानच्या नांग्या ठेचणारा Saurabh Netravalkar 'या' कारणामुळे खेळणार नाही उर्वरित वर्ल्ड कप?

Saurabh Netravalkar : पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचं तोंड दाखवणारा युएसएचा गोलंदाज (USA) सौरभ नेत्रावळकर संपूर्ण वर्ल्ड कप (T20 world cup) खेळणार की नाही? अशी शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं कारण काय? समजून घेऊया

सौरभ तळेकर | Updated: Jun 7, 2024, 04:09 PM IST
USA ला मोठा धक्का, पाकिस्तानच्या नांग्या ठेचणारा Saurabh Netravalkar 'या' कारणामुळे खेळणार नाही उर्वरित वर्ल्ड कप? title=
Saurabh Netravalkar Will Not Playing in Full T20 World Cup

Saurabh Netravalkar, Pakistan vs USA : क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ... क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. अशातच आता टी-ट्वेंटी फॉरमॅटचा (T20 world cup 2024) खेळ गेल्या दोन वर्षात बदलला आहे. याचाच प्रतत्य पाकिस्तान आणि युएसए यांच्यातील सामन्यात (USA vs Pak) पहायला मिळाला. लिंबू टिंबू समजल्या जाणाऱ्या युएसए संघाने सुपर ओव्हरमध्ये तगड्या पाकिस्तान संघाचा पराभव केला. पाकिस्तानचा पराभव करण्यात सर्वात मोठा वाटा राहिला तो डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर (Saurabh Netravalkar) याचा... सौरभने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर सुपर ओव्हरमध्ये 18 धावा रोखून धरल्या अन् डिफेन्डिंग चॅम्पियन पाकिस्तानचा पराभव करत युएसए संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

टीम इंडियासाठी अंडर-19 वर्ल्ड कप खेळलेला सौरभ नेत्रावळकर फक्त क्रिकेटर नाही तर तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर देखील आहे. अमेरिकेत तो सॉफ्टवियर इंडिनियरची नोकरी करतो. वर्ल्ड कपसाठी त्याने खास ऑफिसमध्ये सुट्टी टाकली होती. मात्र, आता त्याची ऑफिसमधून घेतलेली रजा संपणार असल्याने तो सुपर 8 मध्ये खेळणार की नाही? यावर शंका उपस्थित होत आहे. युएसए संघ सध्या अ गटात आहे. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर आता युएसए संघ सुपर 8 मध्ये खेळण्याची शक्यता आहे. मात्र, जर युएसए सुपर 8 मध्ये गेली तर सौरभ नेत्रावळकरला आणखी रजा घ्यावी लागेल. तसेच त्याला कंपनी सुट्टी देणार का? यावर युएसए संघाचं भवितव्य अवलंबून असेल. 

सौरभ नेत्रावळकरचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 ला मुंबईत झाला होता. तो अंडर 19 विश्वचषक 2010 मध्ये भारताकडून खेळला होता. त्यानंतर त्याने 2013 मध्ये कर्नाटकविरुद्धच्या एकमेव रणजी सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केलं. नंतर तो यूएसएला गेला अन् 2018 मध्ये त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये सौरभ यूएसचा कर्णधार झाला. 2022 मध्ये झिम्बाब्वे येथे झालेल्या T20 विश्वचषक ग्लोबल क्वालिफायरमध्ये देखील त्याने युएसएकडून भेदक गोलंदाजी केली होती. टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये युएसएसाठी पाच विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.

दरम्यान, उत्तम कामगिरी करून देखील सौरभला रणजी संघात स्थान मिळालं नाही. केएल राहुल, मयंक आग्रवाल आणि इतर सहकाऱ्यांना संधी मिळत गेल्या. मात्र, संघात स्थान मिळत नसल्याने सौरभने शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याने मास्टर्ससाठी विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती मिळाल्यावर अमेरिका गाठली अन् खेळाबरोबर करियर केलं. मात्र, त्याने क्रिकेट खेळणं सोडलं नाही. त्याने क्रिकेटसाठी एक अॅप देखील तयार केल्याची माहिती समोर आली होती.