'कोणाला माझी काळजी नाही...', ऋषभ पंतवरून ट्रोल झाल्यावर उर्वशी रौतेलाचं दु: ख आलं समोर

उर्वशीचा हा व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

Updated: Oct 13, 2022, 06:02 PM IST
'कोणाला माझी काळजी नाही...', ऋषभ पंतवरून ट्रोल झाल्यावर उर्वशी रौतेलाचं दु: ख आलं समोर  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. सध्या उर्वशी ही ऑस्ट्रेलियाला असून तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. उर्वशी तिथले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. मात्र, तिचे हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर उर्वशीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्यावर उर्वशीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. याशिवाय कोणाला तिची काळजी नाही असं देखील ती म्हणाली आहे. 

उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्वशी टेरेसच्या कडेला साडी नेसून उभी आहे. मोहब्बतें चित्रपटाच्या संगीतासह व्हिडिओच्या पार्श्वभूमीत शायरी सुरु आहे. तर ही पोस्ट शेअर करत उर्वशीनं कॅप्शन दिलं की 'पहिल्यांदा इराणमध्ये #MahsaAmini आणि आता भारतात… माझ्यासोबत असे घडत आहे की मला स्टॉकर म्हणत मला बुली करण्यात येत आहे. कोणाला माझी काळजी नाही किंवा कोणी माझं समर्थन करत नाही... एक सशक्त स्त्री तिच असते, जी मनापासून प्रेम करते. ती कोमल आणि सामर्थ्यवान, व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही आहे. ती जगातील सर्वोत्तम आहे. ती जगासाठी एक भेट आहे.' (urvashi rautela shared video on social media after trolling over rishabh pant trolling )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यानंतर आता उर्वशीनं ऑस्ट्रेलियाला जाण्याबद्दल अनेकांनी तिचे ऋषभ पंतशी (Rishabh Pant) नाव जोडले आहे. यानंतर ती ट्रोलही झाली. आता या ट्रोलर्सला उर्वशीने सडेतोड उत्तर दिले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने ऑस्ट्रेलियाचा नकाशा शेअर केला आहे. ‘हा नकाशा खास भारतीय मीडियासाठी आहे. एकदा हा नकाशा पाहून घ्या की ऑस्ट्रेलिया किती मोठा देश आहे’, असे कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे. 

urvashi rautela shared video on social media after trolling over rishabh pant trolling

दरम्यान, या आधी उर्वशी आणि भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता ऋषभची गर्लफ्रेंड असून तिचं नाव ईशा नेगीसह रिलेशनशिपमध्ये आहे. ऋषभने उर्वशीला इन्स्टाग्रामवरून ब्लॉक केल्यामुळे ते दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले होते.