T20 World Cup | विराट कोहलीच्या कॅप्ट्न्सीत 'हिटमॅन' सुपर'हिट', रोहितच्या आसपासही कोणीही नाही

विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे दोघेही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फलंदाज आहेत. 

Updated: Nov 4, 2021, 07:10 PM IST
T20 World Cup | विराट कोहलीच्या कॅप्ट्न्सीत 'हिटमॅन' सुपर'हिट', रोहितच्या आसपासही कोणीही नाही title=

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे दोघेही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फलंदाज आहेत. दोघेही बॅट्समॅन्स सातत्याने टीम इंडियाच्या विजयात महत्तवपूर्ण भूमिका बजावत आहेत. बुधवारी अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध झालेल्या सामन्यात रोहितने 74 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. रोहितला या धमाकेदार खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. रोहितने या मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासह एक नवा विक्रम करेला आहे. नेमका काय आहे रेकॉर्ड याबाबत आपण जाणून घेऊयात. (Under the leadership of Virat Kohli in ICC tournaments Rohit Sharma has won the most Man of the Match award for the most times)

रोहितने विराट कोहलीच्या नेतृत्वात आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार पटकावले आहेत. रोहित आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विराटच्या नेतृत्वात 6 वेळा 'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे. विराटने आतापर्यंत 2017 आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी, वनडे वर्ल्ड कप  2019 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. तर सुरु असलेला टी 20 वर्ल्ड कप ही विराटची कर्णधार म्हणून आयसीसीची तिसरी स्पर्धा आहे.
 
रोहितनंतर 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराह सामनावीर पुरस्कारच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बुमराह आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विराटच्या नेतृत्वात दोनदा 'मॅन ऑफ मॅच' ठरला आहे. तर स्वत: विराट फक्त एकदाच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. तसेच शिखर धवन आणि युवराज सिंह या दोघांनीही विराटच्या नेतृत्वात प्रत्येकी एक वेळा 'मॅन ऑफ द मॅच' ठरले आहेत.

रोहित 2019 पासून आघाडीवर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2019 मध्ये रोहित शर्मा 'मॅन ऑफ मॅच' पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. रोहिनते 2019 पासून 12 वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. रोहितनंतर बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनचा नंबर आहे. शाकिबने 10 वेळा 'मॅन ऑफ मॅच' ठरला आहे.

यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि विराट कोहली संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोघांनी प्रत्येकी 9 वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. तर इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नरने प्रत्येकी 8 वेळा हा पुरस्कार मिळवला आहे.