'साऊदी, न्यूझीलंड आणि सुपर ओव्हर'चा नकोसा विक्रम

न्यूझीलंडविरुद्धची चौथी टी-२० मॅचही भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकली.

Updated: Jan 31, 2020, 10:20 PM IST
'साऊदी, न्यूझीलंड आणि सुपर ओव्हर'चा नकोसा विक्रम title=

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धची चौथी टी-२० मॅचही भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकली. याआधी तिसऱ्या टी-२० मॅचमध्येही भारताचा सुपर ओव्हरमध्येच विजय झाला होता. एखाद्या सीरिजच्या लागोपाठ २ मॅच टाय होऊन सुपर ओव्हर खेळवण्याची ही पहिलीच वेळ होती. या दोन्ही मॅचच्या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या टीम साऊदीने बॉलिंग केली. सुपर ओव्हरमध्ये बॉलिंग करायची टीम साऊदीची ही काही पहिलीच वेळ नव्हती. पण आतापर्यंत सुपर ओव्हरमधलं टीम साऊदीचं रेकॉर्ड अत्यंत खराब आहे.

टीम साऊदीप्रमाणेच न्यूझीलंडलाही सुपर ओव्हरमध्ये पराभवालाच सामोरं जावं लागलं आहे. २०१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही इंग्लंड आणि न्यूझीलंडची मॅच टाय झाली होती. यानंतर झालेली सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यामुळे अखेर इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं.

आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये २०१०नंतर न्यूझीलंडने ६ सुपर ओव्हर खेळल्या आहेत. या सगळ्या ६ सुपर ओव्हरमध्ये टीम साऊदीने बॉलिंग केली. २०१० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्राईस्टचर्चमध्ये झालेल्या सुपर ओव्हरमध्ये साऊदीने न्यूझीलंडला जिंकवलं होतं. यानंतर मात्र साऊदीने टाकलेल्या सगळ्या सुपर ओव्हरनंतर न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला.

टीम साऊदीची सुपर ओव्हरमधली कामगिरी 

६ रन ऑस्ट्रेलियाविरुद्ध, क्राईस्टचर्च, २०१० (न्यूझीलंडचा विजय)

१३ रन श्रीलंकेविरुद्ध, पल्लेकेल, २०१२ (न्यूझीलंडचा पराभव)

१९ रन वेस्ट इंडिजविरुद्ध, पल्लेकेल, २०१२ (न्यूझीलंडचा पराभव)

१७ रन इंग्लंडविरुद्ध, ऑकलंड, २०१९ (न्यूझीलंडचा पराभव)

२० रन भारताविरुद्ध, हॅमिल्टन, २०२० (न्यूझीलंडचा पराभव)

१६ रन भारताविरुद्ध, वेलिंग्टन, २०२० (न्यूझीलंडचा पराभव)

न्यूझीलंडची सुपर ओव्हरमधली कामगिरी 

टी-२०- वेस्ट इंडिजविरुद्ध, ऑकलंड, २०१८- पराभव 

टी-२०- ऑस्ट्रेलियाविरुद्ध, क्राईस्टचर्च, २०१०- विजय 

टी-२०- श्रीलंकेविरुद्ध, पल्लेकेल, २०१२- पराभव 

टी-२०- वेस्ट इंडिजविरुद्ध, पल्लेकेल, २०१२- पराभव

वनडे- इंग्लंडविरुद्ध, लॉर्ड्स, २०१९- पराभव 

टी-२०- इंग्लंडविरुद्ध, ऑकलंड, २०१९- पराभव

टी-२०- भारताविरुद्ध, हॅमिल्टन, २०२०- पराभव

टी-२०- भारताविरुद्ध, वेलिंग्टन, २०२०- पराभव