मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच सोबत विराट कोहलीनं महिला माजी क्रिकेटपटूला देखील मोठी मदत केली आहे. या महिला माजी क्रिकेटपटूची आई आजारी असल्यानं कोहली मदतीसाठी पुढे धावला. कोहलीनं केलेल्या मदतीमुळे त्यांचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
कोरोना काळात केलेली मदत असो किंवा महिला माजी क्रिकेटपटूला मदतीसाठी पुढे केलेला हात असुदे विराट कोहलीनं या गोष्टींमुळे चाहत्यांची मनं जिंकली आहेत. टीम इंडियाची माजी क्रिकेटपटू के एस श्रावंती नायडू यांच्या आईला उपचारासाठी पैशांची गरज होती. कोहलीला याची माहिती मिळताच तो पुढे सरसावला.
माजी क्रिकेटर के एस श्रावंती नायडू के. एस श्रावंती नायडू यांच्या आईच्या उपचारांसाठी विराट कोहलीने पैसे दिले आहेत. श्रावंती यांनी आई एस के सुमन यांचा कोरोना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती खूप गंभीर आहे. अशा परिस्थितीत पैशाअभावी उपचार थांबू नयेत म्हणून कोहलीनं श्रावंती यांना 6.77 लाख रुपयांची मदत केली आहे.
श्रावंती यांच्या आईला मदतीची गरज आहे ही बातमी ट्वीटरच्या माध्यमातून कोहलीपर्यंत पोहोचली. टीम इंडियाचे फील्डिंग कोच श्रीधर यांनी देखील श्रावंती यांना पैशांची जमवाजमव करण्यासाठी मदत केली आहे.