T20 World Cup 2022 : टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी कॅप्टन बदलला

टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपमधील (t20 world cup 2022) पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. 

Updated: Oct 13, 2022, 05:14 PM IST
T20 World Cup 2022 : टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी कॅप्टन बदलला title=

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) वर्ल्ड कप मोहिमेला 23 ऑक्टोबरपासून पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापासून (IND vs PAK) सुरुवात होणार आहे. मात्र याआधी मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपआधी सराव सामने खेळतेय. टीम इंडियाला दुसऱ्याच सराव सामन्यात 36 धावांनी पराभव झाला आहे. तर सराव सामन्यात टीम इंडियाने रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) दुसऱ्या खेळाडूलाच कर्णधार केलंय. (t20 world cup 2022 kl rahul become captain of team india against westren australia for practise match)

टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या सराव सामन्यासाठी रोहितऐवजी केएल राहुलला (K L Rahul) कॅप्टन केलंय. तर रोहित या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. त्यामुळे रोहित प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना केएलला कॅप्टन का केला, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे.

राहुलची अर्धशतकी खेळी

केएलने दुसऱ्या सराव सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली. केएल व्यतिरिक्त टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी टीम इंडियाचा पराभव झाला.  राहुलने  55 बॉलमध्ये 74 धावांची खेळी केली. मात्र केएल टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. तर रोहित शर्मा या सामन्यात खेळला. मात्र फलंदाजीसाठी आला नाही. 

सामन्याचा धावता आढावा

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने 169 धावांचे आव्हान दिले. मात्र टीम इंडियाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 132 धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी टीम इंडियावर विजय मिळवला. केएलने एकट्याने खिंड लढवली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. ऋषभ पंत 9, दिनेश कार्तिक 10 धावा करुन माघारी परतले.