T 20 World Cup2021| ...तर मायदेशात परत येऊ देणार नाही, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला धमकी

 टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2021)  टीम इंडिया आणि पाकिस्तान (INDvsPAK) 24 ऑक्टोबरला आमनेसामने भिडणार आहेत. 

Updated: Oct 18, 2021, 04:53 PM IST
T 20 World Cup2021| ...तर मायदेशात परत येऊ देणार नाही, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला धमकी title=

यूएई : बहुप्रतिक्षित टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup2021) 5 वर्षानंतर सुरुवात झाली. क्रिकेटच्या या रनसंग्रामाचं यूएई आणि ओमानमध्ये आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तान 24 ऑक्टोबरला आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघांसाठी वर्ल्ड कपपेक्षा हा सामना प्रतिष्ठेचा असतो. हा सामना जिंकला की, वर्ल्ड कप जिंकल्याची भावना दोन्ही संघांची असते. (T20 World Cup 2021 cricket fans threaten Pakistan captain Babar Azam)

दोन्ही संघांमध्ये होणारा हा सामना हायव्होलटेज असतो. या सामन्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी आहेत. दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) धमकी देण्यात आली आहे. 

भारताकडून हरलात तर मायदेशात परत येऊ देणार नाही, अशी धमकी  बाबर आझमला देण्यात आली आहे. बाबरने या टी 20 क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा मागितल्या. यावर काही जणांनी प्रतिक्रिया दिल्या. 

यामध्ये एका नेटकऱ्याने धमकीच्या सुरात कमेंट केली. घरी परतु देणार नाही, असं Rahil Bhat ने धमकीच्या आवेशात म्हंटलं. तर काही जणांनी मौका-मौका या जाहिराचतीची जोड देत म्हंटलं की, ही अखेरची संधी आहे. 

दोन्ही टीम टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 5 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 5 ही वेळी टीम इंडियाने पाकिस्तानवर मात केली आहे. त्यामुळे या वेळेस 6 व्यांदा पाकिस्तानवर मात करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल. 

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी. 
 
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल.  

पाकिस्तान : बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आसिफ अली, सोहैब मसूद, सरफराज अहमद (विकेटकीपर), हैदर अली, फखर जमान, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन अफरीदी, हॅरिस रौफ, हसन अली आणि इमाद वसीम. 

रिजर्व प्लेअर : उस्मान कादीर, शाहनवाज दहानी आणि खुशदिल शाह.