Suryakumar Yadav : आता लोकं बोलणार नाही की, देविशा...; सूर्याने ट्रोलर्सना सुनावले खडे बोल

Suryakumar Yadav : गेल्या काही दिवसांपासून सूर्यकुमार यादव खराब फॉर्ममध्ये होता. यावेळी सूर्यावर अनेक टीका देखील करण्यात आल्या. यावेळी त्याची पत्नी देविशावरूनही टीकेची झोड उठवण्यात आली होती. अखेर गुजरातविरूद्ध शतक ठोकल्यानंतर सूर्याने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय.

Updated: May 14, 2023, 08:43 PM IST
Suryakumar Yadav : आता लोकं बोलणार नाही की, देविशा...; सूर्याने ट्रोलर्सना सुनावले खडे बोल title=

Surya Answer to the Trollers: शुक्रवारी वानखेडेच्या मैदानावर सूर्यकुमारच्या ( Suryakumar Yadav ) नावाचं तुफान वादळ पहायला मिळालं. गुजरात टायटन्सविरूद्धच्या ( Gujarat Titans ) सामन्यात सूर्याने त्याच्या आयपीएलच्या ( IPL 2023 ) करियरमधील पहिलं शतक झळकावलं. मुंबईने इंडियन्सने या सामन्यात 27 रन्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. दरम्यान हा सामना संपल्यानंतर सूर्याने ट्रोलर्सना ( Surya Answer to the Trollers ) खास उत्तर दिलं आहे. 

गुजरात विरूद्ध मुंबई हा सामना पाहण्यासाठी सूर्यकुमार यादवची ( Suryakumar Yadav ) संपूर्ण फॅमिल मैदानात आली होती. यावेळी त्यांनी सूर्याच्या शतकानंतर त्याचं कौतुक करताना दिसले. 

गुजरातला नमवल्यानंतर सूर्या ( Suryakumar Yadav ) म्हणाला, "माझ्या शतकाने मला फार आनंद झालाय. मुळात आता लोकं बोलू शकणार नाहीत की, देविशा आली होती, त्यामुळे मी शतक झळकावू शकलो नाही. आजच्या या सामन्यात माझ्या कुटुंबाला पाहून मला बरं वाटलं. स्टँडमध्ये देविशा बसली होती आणि ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. तिने आतापर्यंत माझी तीन आंतरराष्ट्रीय शतकं पाहिली नव्हती. त्या सामन्यांसाठी ती स्टेडियममध्ये उपस्थित नव्हती."

मुंबई इंडियन्सने सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये सूर्याचे ( Suryakumar Yadav ) आई, वडील, पत्नी, बहीण त्याच्या खेळीचं कौतुक करतायत. सूर्याची पत्नी देविशा ( Devisha shetty ) म्हणते, "क्रिकेट हा सूर्याच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनलाय. तो क्रिकेटबाबतीत घडलेल्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी घरात कधीच आणत नाही. या सर्व गोष्टी मैदानावरच ठेऊन तो घरी येतो."

या व्हिडीओमध्ये सूर्याचे वडील म्हणाले की, आम्ही त्याला सांगितलं होतं की, ज्यावेळी तो शतक झळकावेल तो सामना आम्हाला पहायचा आहे. अखेर आम्ही हा सामना पहायला. मला फार अभिमान वाटतोय."

सूर्याचं आयपीएलमधील पहिलं शतक

गुजरातविरूद्धच्या सामन्यात सूर्याने ( Suryakumar Yadav ) त्याच्या आयपीएलच्या करियरमधील पहिलं शतक झळकावलं. अखेर सूर्याने गुजरातविरूद्धच्या सामन्यात त्याचं खरं रूप दाखवून दिलं. या सामन्यात सूर्याने 49 बॉल्समध्ये 103 रन्सची नाबाद खेळी केली. यावेळी त्याने 11 फोर आणि 6 सिक्स लगावले होते. गुजरातविरूद्ध 210.20 च्या स्ट्राईक रेटने सूर्याने फलंदाजी केली.