IPL 2023 : चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; आयपीएलमध्ये Suresh Raina करतोय कमबॅक

ऑक्शन जवळ आलं असतानाच आता पुन्हा एकदा मिस्टर आयपीएल (Mr. IPL) म्हणजे सुरेश रैनाची (Suresh Raina) चर्चा सुरु झाली आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण आगामी आयपीएलमध्ये सुरेश रैना कमबॅक करणार आहे. 

Updated: Dec 17, 2022, 06:05 PM IST
IPL 2023 : चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; आयपीएलमध्ये Suresh Raina करतोय कमबॅक title=

IPL 2023 Auction Suresh Raina  : आयपीएल 2023 चं मिनी ऑक्शनसाठी (IPL 2023 mini auction) आता केवळ एक आठवडा उरला आहे. येत्या 23 डिसेंबरला आयपीएलचं मिनी ऑक्शन केरळच्या कोच्ची (Kochi city of Kerala) शहरात पार पडणार आहे. क्रिकेट प्रेमी या ऑक्शनसाठी फार उत्सुक आहेत. या ऑक्शनमध्ये जवळपास 400 हून (400 players) अधिक खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यावेळी जास्तीत जास्त 87 खेळाडूंची खरेदी होऊ शकते. ऑक्शन जवळ आलं असतानाच आता पुन्हा एकदा मिस्टर आयपीएल (Mr. IPL) म्हणजे सुरेश रैनाची (Suresh Raina) चर्चा सुरु झाली आहे. 

आयपीएल 2023 मध्ये रैना करणार कमबॅक

क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण आगामी आयपीएलमध्ये सुरेश रैना कमबॅक करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रैना आयपीएल 2023 मध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे. मात्र यावेळी तो खेळाडूच्या रूपात नाही तर रैना जियो सिनेमा (Jio Cinema) साठी एक्स्पर्ट म्हणून दिसून येण्याची शक्यता आहे. 

मिनी ऑक्शनचं लाईव्ह स्ट्रिमींग जिओ सिनेमावर दाखवलं जाणार आहे. यामध्ये सुरेश रैनासोबत ख्रिस गेल आणि  एबी डिविलियर्स देखील खास पाहुणे म्हणून दिसतील. जिओ सिनेमाने खुद्द ट्विट करून याची माहिती दिली आहे. 

सुरेश रैनाने घेतलीये निवृत्ती

सुरेश रैनाने (Suresh Raina) 15 ऑगस्ट 2020 मध्ये धोनीसोबत इंटरनॅशनल क्रिकेटमधून (international cricket) निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती. यानंतर तो 2021 मध्ये आयपीएल खेळला आणि पुढच्याच वर्षी चेन्नई सुपर किंग्सने त्याचं नाव रिलीद केलं. गेल्या सिझननंतर सुरेश रैनाने आयपीएलमधून देखील निवृत्ती घेतली. 

चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यात रैनाचा मोठा वाटा

आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्स करण्याच्या बाबतीत सुरेश रैना दीर्घकाळ अव्वल होता. चेन्नई सुपर किंग्ज ही आयपीएलमधील मुंबई इंडियन्सनंतरची दुसरा सर्वात यशस्वी टीम मानली जाते. चेन्नईला चार वेळा चॅम्पियन बनवण्यात सुरेश रैनाचा खूप मोठा वाटा आहे.