Australia vs South Africa: दोन सेकंदात खेळ खल्लास... कॅच पाहून वॉर्नरही झाला शॉक; डोळ्याचं पारणं फेडणारा Video

Australia v South Africa 1st test: डावाच्या पहिल्याच चेंडूवर एका उसळी घेणाऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर (David Warner) बाद झाला. वॉर्नरला भोपळा देखील फोडता आला नाही. पहिल्याच बॉलवर रबाडाने (Rabada) वॉर्नरची परीक्षा घेतली. 

Updated: Dec 17, 2022, 05:33 PM IST
Australia vs South Africa: दोन सेकंदात खेळ खल्लास... कॅच पाहून वॉर्नरही झाला शॉक; डोळ्याचं पारणं फेडणारा Video title=
David Warner Catch by Khaya Zonda

David Warner Catch by Khaya Zonda: आगामी आयसीसीच्या टेस्ट वर्ल्ड कपसाठी (ICC Test World Cup) आता सर्वच संघ जोरदार तयारी करताना दिसत आहेत. आयसीसी टेस्ट वर्ल्ड कपची फायनल गाठण्यासाठी एक एक पॉइंट महत्त्वाचा ठरेल. अशातच आता ऑस्ट्रेलिया (Australia) आणि साऊथ अफ्रिका (South Africa) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये पहिला कसोटी सामना खेळला (AUS vs SA 1st Test) जात आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलिया आणि साऊथ अफ्रिकेत सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कॅप्टनचा निर्णय बरोबर ठरवत अफ्रिकेचा संघ 152 धावांवर तंबूत परतवला. विकेटकिपर व्हेरीनला (Verreynne) वळगता कोणालाही मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. व्हेरीनच्या 64 धावांमुळे साऊथ अफ्रिकेला 152 धावांचं आव्हान उभं करता आलं. त्यानंतर आता 153 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने आत्तापर्यंत 145 धावा केल्या आहेत.

आणखी वाचा - Mohammed Siraj मध्ये सुधारणा नाहीच; चौथ्या दिवशी बांग्ला खेळाडूंशी पंगा; VIDEO व्हायरल

सध्या सुरू असलेल्या सामन्यात एक वेगळं दृश्य पहायला मिळालं. ऑस्ट्रेलियाची सुरूवात देखील चांगली झाली नाही. डावाच्या पहिल्याच चेंडूवर एका उसळी घेणाऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर (David Warner) बाद झाला. वॉर्नरला भोपळा देखील फोडता आला नाही. पहिल्याच बॉलवर रबाडाने (Rabada) वॉर्नरची परीक्षा घेतली. बाऊंसर बॉलला प्लेस करण्याच्या नादात बॉल उडाला आणि थेट झोंडोने (Zondo) दोन सेकंदात वॉर्नरचा खेळ खल्लास केला. 

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, वॉर्नरच्या विकेटचा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाची सुरूवात देखील खराब झाली. वॉर्नर शुन्य तर उस्मान ख्वाजा 11 धावा करत परतला. तर लबुश्युगे आणि स्मिथ देखील झटपट बाद झाले. नॉर्जेयाने स्मिथचा (Steven Smith) काढलेला बोल्ड अभूतपुर्व होता. तर बॉलेंट देखील1 रन करत तंबूत परतला आहे.