नवी दिल्ली : आपल्या करिअरचं ११वं शतक करणारा झळकावणारा सलामी फलंदाज शिखर धवन(नाबाद १३२) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद ८२) या जोडीने दुस-या विकेटसाठी १९७ रन्सची भागिदारी करत श्रीलंकेला ९ विकेटने मात दिली.
या विजयासोबतच भारताने पाच सामन्यांच्या सीरीजमध्ये १-० अशी अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंके विरूद्धच्या या पहिल्याच वनडे सामन्यात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने पुन्हा एकदा अफलातून स्टंपिंग करत अनेकांना तोंडात बोटे घालायला भाग पाडलं आहे.
श्रीलंकेचा लसिथ मलिंगाला आऊट करण्यासाठी धोनीने क्लासी स्टंपिंग केली आणि भारताने सहज हा सामना ९ विकेटने जिंकला. धोनीची बॅटींगमधील आक्रामकता भलेही कमी झाली असेल, मात्र स्टंप्सच्या मागे उभ्या राहत असलेल्या या विकेटकीपरकडे सध्या कुणीही बोट दाखवू शकत नाहीये.
— cricket (@84107010ghwj) August 20, 2017
यजुवेंद्र चहलच्या एका बॉलवर धोनीने मलिंगाला असं काही आऊट केलं की, सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मलिंगाने पिचवर येताच चहलच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चहलला आधीच अंदाज आला होता की, मलिंगा काय करणार आहे. त्यामुळे चहलने ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉल टाकला. धोनीने या संधीचं सोनं केलं. मलिंगा जसाही समोर गेला धोनीने बेल्स उडवल्या. मलिंगाला परत येण्याची सुद्धा संधी धोनीने त्याला दिली नाही.