इमरान ताहीरने पत्नीसाठी सोडला देश, सौंदर्याच्याबाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देते टक्क्कर

दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज इमरान ताहीरची Love Story आहे खूपच मनोरंजक, वाचा

Updated: Oct 15, 2022, 03:41 PM IST
इमरान ताहीरने पत्नीसाठी सोडला देश, सौंदर्याच्याबाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देते टक्क्कर title=

Cricket News : दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) माजी क्रिकेटर इमरान ताहीर (Imran Tahir) आपल्या स्पीन गोलंदाजीने संघाला अनेक शानदार विजय मिळवून दिले. आपल्या चाहत्यांमध्येही ताहीर लोकप्रिय आहे. पण अनेक जणांना ही गोष्ट माहित नाहीए, की ताहीरचा जन्म पाकिस्तानात (Pakistan) झाला आहे. ताहिरचं संपूर्ण शिक्षणही पाकिस्तानमध्येच झालं. पण नंतर क्रिकेटसाठी त्याने दक्षिण आफ्रिकेची निवड केली. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ निवडण्यामागेही मोठी रंजक कहाणी आहे. 

दक्षिण आफ्रिकेत जडलं प्रेम
इमरान ताहीरला आपल्या प्रेमासाठी देश सोडवा लागला होता. 1986 मध्ये इमरान पाकिस्तानकडून 19 वर्षांखालील क्रिकेट सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेला होता. इथं त्याची ओळख सुमैय्या (Sumayya Dildar) नावाच्या मुलीशी झाली. सुमैया खूपच सुंदर आणि स्टायलिश आहे. दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध मॉडेल म्हणून तिने आपली ओळख तयार केली. इमरान ताहीर पहिल्याच भेटीत सुमैय्याच्या प्रेमात पडला. पण त्यावेळी सुमैयाच्या मनात ताहीरबद्दल फारसं काही नव्हतं. स्पर्धेनंतर इमारन पाकिस्तानला परतला. 

पण पाकिस्तानात परतल्यानंतरही इमरान ताहीर सुमैयाला विसरु शकला नाही. काही ना काही कारणाने तो दक्षिण आफ्रिकेला जाऊन तो सुमैयाला भेटण्याचा प्रयत्न करत असे. काही भेटींनंतर अखेर इमरानने आपल्या मनातली इच्छा सुमैयालाकडे बोलून दाखवली. सुमैय्याने इमरानला होकार दिला. शेवटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

प्रेमासाठी सोडला देश

इमरानला पाकिस्तान क्रिकेट संघाकडूनच आपलं क्रिकेट करियर घडवायचं होतं. पण सुमैयाला दक्षिण आफ्रिका सोडायचं नव्हतं. अखेर 2006 मध्ये इमरान ताहीरने पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाला. एक वर्षानंतर म्हणजे 2007 मध्ये इमरान आणि ताहीरने लग्न केलं.

इमारन ताहीरची क्रिकेट कारकिर्द
दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना इमरान ताहीरने 20 कसोटी (Test Cricket) सामन्यात 57 विकेट घेतल्या. 130 धावांवर 8 विकेट ही कसोटीतली त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर 107 एकदिवसीय सामन्यात (ODI Cricket) त्याच्या खात्यात 173 विकेट जमा आहेत. 45 धावांमध्ये 7 विकेट ही त्याची एकदिवसीय क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. इमरान ताहीर 38 टी20 सामने खेळला असून यात त्याने 68 विकेट घेतल्या आहेत.