मुंबई : वुमेन्स आशिया कपमध्ये (Asia Cup) टीम इंडियाने (Team India) बाजी मारली आहे. टीम इंडियाने 2022 आशिया कप उंचावला आहे. या विजयासह टीम इंडियाने सातव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने 8 विकेट आणि 69 बॉल राखून हा मोठा विजय मिळवला आहे.
आशिया कपच्या (Asia Cup) फायनल सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियासमोर (India vs Sri Lanka) 65 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने (Team India सहज पुर्ण करत अंतिम सामना जिंकलाय. स्मृती मंधनाने सर्वाधिक 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत तिने 6 फोर आणि 3 सिक्स मारले होते. या धावांच्या बळावर टीम इंडियाने श्रीलंकेवर 8 विकेट आणि 69 बॉल राखून सहज विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयाच्या शिल्पकार स्मृती मंधना ठरलीय.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेची (Sri Lanka) सुरूवात चांगली झाली नाही. श्रीलंकेची चामरी आटापठू 6, अनुष्का संजीवनी 2, हरशिष्ठा समराविख्रमा 1, निलाष्की सिल्वा 6, कविशा दिलहरी 1, सुगंदिका कुमारी 6, हसिनी परेरा, मालशा शेहानी शुन्य धावा करून आऊट झाल्या. इनोका राणाविरा 18 आणि ओषाठी राणासिंघे 13 या दोघांनी दुहेरी धावसंख्या गाठली. अचिनी कुलासुरीया 6 वर नाबाद राहीली. या धावसंख्येच्या बळावर श्रीलंकेने 9 विकेट गमावून 65 धावा गाठल्या. श्रीलंकेकडून इनोका राणाविरा 18 अशी सर्वाधिक धावा केल्या. टीम इंडियाकडून रेणूकाने 3 ओव्हरमध्ये 5 रन देऊन 3 विकेट घेतल्या.
हे ही वाचा : क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम! 8 खेळाडू एकेरी धावसंख्येवर OUT
श्रीलंकेने दिलेले आव्हान टीम इंडियाने 8 विकेट आणि 69 बॉल राखून सहज पुर्ण करत हा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने सातव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं आहे.