विराट सोबत नाचला आणि अनुष्काच्या कुशीत झोपला 'गब्बर' चा मुलगा

इटलीमध्ये विवाहबद्ध झालेले विरानुष्का भारतामध्ये परतले आहेत.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 22, 2017, 05:53 PM IST
विराट सोबत नाचला आणि अनुष्काच्या कुशीत झोपला 'गब्बर' चा मुलगा   title=

दिल्ली : इटलीमध्ये विवाहबद्ध झालेले विरानुष्का भारतामध्ये परतले आहेत.

२१ डिसेंबरला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत पार पडले. या रिसेप्शन सोहळ्यादरम्यान अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटर्स समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उपस्थिती लावली होती.   

धम्माल मस्ती 

विराट कोहली हा पंजाबी गाण्याचा चाहता आहे. हे सर्वशृत आहे. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्येही पंजाबी गाण्याचा समावेश करण्यात आला होता. गायक गुरूदास मान यांनी विरूष्काच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये लाईव्ह परफॉर्मंस केला होता.   

 

सहकार्‍यांसोबत डान्स 

विराट कोहलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शिखर धवननेही सह कुटुंब हजेरी लावली होती. शिखर टीम इंडियामध्ये 'गब्बर' आणि ' जट्टजी' या नावाने प्रसिद्ध आहे.  विराट अनुष्काने स्वागत समारंभ झाल्यानंतर मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत डान्स केला. यावेळेस शिखर धवनने विराट आणि अनुष्काला साथ दिली. शिखर धवनचा मुलगादेखील विराटसोबत असल्याचे काही फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत.  .

 

 

विराट सोबत नाचला आणि अनुष्काच्या कुशीत झोपला 

 

 

 

A post shared by Aesha Dhawan (@aesha.dhawan5) on

 

शिखरचा मुलगा विराट सोबत नाचल्यानंतर अनुष्काच्या कुशीत शांतपणे झोपल्याचा फोटो शिखरच्या पत्नीने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.