'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...

Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 28, 2024, 06:11 PM IST
'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...  title=

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्वचितच हसताना दिसतो. दरम्यान, चाहत्यांना त्याचा एक व्हिडिओ मिळाला आहे, ज्यामध्ये तो खूप हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ आयपीएल 2024 च्या फायनलचा आहे. ज्यामध्ये KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली आहे. किंग खान आणि जुही चावला यांच्या सह-मालकीची आयपीएल टीम आहे. आर्यन खानचा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आर्यन खान आपल्या मित्रांसोबत व्हीआयपी स्टँडमध्ये हसताना आणि मज्जा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर भरपूर प्रतिक्रिया देखील येत आहे. 

आर्यनचे हे दुर्मिळ हसणे पाहून त्याची आई गौरी खानची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी होती. आयपीएल सामन्यातून व्हायरल होत असलेल्या आर्यन खानचा हा व्हिडिओ येथे पहा-

पाहा आर्यनचा व्हिडीओ

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aryan Khan (@aryanxcutie)

 

व्हिडीओवर प्रतिक्रिया 

आर्यन खानला हसताना पण येतं का? असा प्रश्न एका युझरने त्या व्हिडीओ खाली कमेंट केला आहे. तर काहींनी म्हटलंय की, आर्यन खानला हसता पण येत नाही... असं कोण हसतं? अशा वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत. 

कायम असतो असा 

आर्यन खान नेहमीच कॅमेऱ्यासमोर गंभीर राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर आर्यन हसतानाचा एकही फोटो नाही. आर्यन खान कोणत्याही कार्यक्रमात किंवा पापाराझी स्पॉटिंगमध्येही हसताना दिसत नाही. अशा परिस्थितीत आर्यनला आयपीएल सामन्यादरम्यान मनमोकळेपणाने हसताना पाहून इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचे हसणे पाहून अनेकांनी आर्यनला हिरो मटेरिअल घोषित करायला सुरुवात केली आहे. मात्र, आर्यन खानला अभिनय क्षेत्रात यायचे नसून त्याला एक यशस्वी उद्योगपती व्हायचे आहे आणि त्याने त्याची क्लोदिंग लाइनही सुरू केली आहे.