RCB vs RR : कॅप्टन बदललं आणि नशीबही...; विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा दुसरा विजय

चिन्नास्वामी स्टेडियमवर राजस्थान रॉयल (Rajasthan Royals) आणि चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगला होता. हा सामना आरसीबीने 7 रन्सने जिंकला आहे.

Updated: Apr 23, 2023, 08:12 PM IST
RCB vs RR : कॅप्टन बदललं आणि नशीबही...; विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा दुसरा विजय title=

RCB vs RR : चिन्नास्वामी स्टेडियमवर राजस्थान रॉयल (Rajasthan Royals) आणि चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगला होता. हा सामना आरसीबीने 7 रन्सने जिंकला आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली आरसीबीने हा सलग दुसरा सामना जिंकला आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 189 रन्स केले होते. यावेळी राजस्थानची टीम केवळ 182 रन्स करू शकली आणि सामना गमावला.

बंगळूरूविरूद्धच्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकला. यावेळी राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 189 रन्स केले. आणि राजस्थानला 190 रन्सचं आव्हान दिलं. 

राजस्थानचा पराभव, हेटमायर फेल

आजच्या सामन्यात जॉस बटलरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र बटलर केवळ 2 बॉल खेळून शून्यावर बाद झाला. यानंतर ओपनर यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी आरसीबीच्या गोलंदाजांना चांगलंच चोपलं. या दोघांमध्ये 98 रन्सची अर्धशतकी पार्टनरशिप झाली. देवदत्तने 52 रन्स केले. कर्णधार संजू सॅमसन 22 तर हेटमायर 3 रन्स करून आऊट झाला. ध्रुव जुरेलने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र पराभवाचा सामना राजस्थानला करावाच लागला.

फाफ आणि मॅक्सवेलची तुफान बॅटींग

आजच्या या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर आरसीबीच्या फलंदाजांनी मात्र हार मानली नाही. ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. फाफने 39 बॉल्समध्ये सामना करत 62 रन्सची खेळी केली. तर मॅक्सवेलने 44 बॉल्समध्ये 77 रन्सची खेळी केली. 

या दोघांशिवाय आरसीबीचा एकही फलंदाज मैदानावर जास्त काळ टिकू शकला नाही. शाहबाज फक्त 2 रन्स, लोमरोर 8 रन्स करून पव्हेलियनमध्ये परतले. शिवाय आजच्या सामन्यात दिनेश कार्तिक देखील केवळ 16 रन्सचं करू शकला. अखेर आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 189 रन्स केले. राजस्थानकडून संदीप शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांनी 2-2 विकेट्स घेतले. तर चहल आणि अश्विनला 1-1 विकेट मिळाली.