Sam Curran: 4 दिवसाचा कर्णधार आणि...; सॅम स्वतःच्याच चुकीवर अंपायर आणि तिलक वर्माशी भिडला

शनिवारी झालेल्या सामन्यात सॅमचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पंजाबचा कर्णधार सॅम करन हा अंपयार आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू तिलक वर्माशी (Tilak Varma) भिडताना दिसतोय. 

Updated: Apr 23, 2023, 07:02 PM IST
Sam Curran: 4 दिवसाचा कर्णधार आणि...; सॅम स्वतःच्याच चुकीवर अंपायर आणि तिलक वर्माशी भिडला title=

Sam Curran: वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात अखेर पंजाबनेच (Punjab Kings) बाजी मारली. पंजाब किंग्जने मुंबईचा (Mumbai Indians) त्यांच्याच घरात पराभव केला. सॅम करनच्या (Sam Curran) नेतृत्वाखाली पंजाबने दुसऱ्यांदा विजयाची नोंद केली. मात्र शनिवारी झालेल्या सामन्यात सॅमचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पंजाबचा कर्णधार सॅम करन हा अंपयार आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू तिलक वर्माशी (Tilak Varma) भिडताना दिसतोय. 

मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात सॅमने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी केली. यानंतर पंजाबने मुंबईसमोर 215 रन्सचं आव्हान देण्यात आलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीन यांनी चांगली फलंदाजी केली. यावेळी सूर्या आणि टीम डेविडने डाव सावरला मात्र 2 ओव्हर बाकी असताना सूर्याची विकेट गेली. आणि त्यामागील फलंदाजांना सामना जिंकवून देणं जमलं नाही. 

सूर्याची विकेट गेल्यानंतर तिलक वर्मा मैदानावर आला. यावेळी नेथन एलिस गोलंदाजी करत होता. एलिसने त्याच्या ओव्हरच्या तिसरा बॉल टाकला, यावेळी डेविडने गॅपमध्ये शॉट खेळला आणि 2 रन काढले. यावेळी जेव्हा तिलकने रन पूर्ण केला.

यावेळी सॅम करनला असं वाटलं की, तो बॉल स्टंपला लागला. याच कारणामुळे तिलक आणि अंपारशी सॅम भिडला. या व्हिडीओमध्ये सॅम चांगलाच संतापला असल्याचं दिसून येतंय. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

मुंबईचा पंजाबकडून पराभव

मुंबई इंडियन्सला शनिवारी वानखेडेच्या मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध 13 रन्सने पराभव स्विकारावा लागला. सलग तीन विजयानंतर मुंबईला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल सुरु झाल्यानंतर पहिले सलग 2 सामने देखील मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान शनिवारच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी भरपूर रन्स खर्च केले.

पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा

सामन्यात पराभव झाल्याने थोडी निराशा झालीये. या सामन्यात आम्ही काही चुका केल्या. पराभव झाला असला तरीही परिस्थितीत खेळाडूंना मनोबल टिकवून ठेवायला आम्ही सांगणार आहोत. आम्ही आतापर्यंत सहा सामने खेळलो असून तीन जिंकले आहेत. तर 3 सामन्यांमध्ये आम्हाला पराभवाचा सामना करावा लागलाय. सूर्या आणि ग्रीन या दोघांनीही चांगली फलंदाजी केली. त्यांनी शेवटपर्यंत विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, असं शर्मा म्हणालाय.