Rohit Sharma Press Conference: भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) उद्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिशद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत त्याने टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन आणि रणनितीबाबत माहिती दिली.
टीम इंडियाचा मिस्टर 360 सुर्यकुमार यादवने टी20 फॉरमॅटमध्ये खुप चांगला खेळ दाखवला आहे. टी20 तील त्याच्या बॅटींगने संपुर्ण क्रिकेट विश्व आश्चर्यचकीत झाले आहे. मात्र सुर्या वनडेत फार काही कमाल दाखवू शकला नाही आहे. त्यात आता त्याच्या टेस्ट डेब्यूची चर्चा आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध त्याला टेस्ट डेब्यू करण्याची संधी आहे.त्याच्यासोबत शुबमन गिलच्या नावाची देखील चर्चा आहे. शुबमन गिलचा टेस्ट डेब्यू आधीच झाला आहे. मात्र नुकतीच वनडेतील डबल सेंच्यूरी आणि टी20 तील सेंच्यूरीने तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्यामुळे त्याला टेस्टच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. दोघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याचे प्रमुख दावेदार मानले जात आहे.
दोन्ही उत्कृष्ट खेळाडू आहेत.शुबमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तर सूर्याने देखील आपल्या खेळाच्या जोरावर टीमसाठी काय देऊ शकतो हे दाखवून दिले आहे. पण प्लेइंग इलेव्हनबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यावर विचार करूनच निर्णय घेऊ, असे रोहित शर्मा म्हणालाय.हे खूप अवघड काम असणार आहे, सर्व खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला बाहेर ठेवले पाहिजे आणि कोणाला संधी दिली पाहिजे. यावर विचार सुरु आहे. आम्ही प्लेइंग इलेव्हनबाबत धाडसी पावले उचलू, असे रोहित म्हणालाय.
पुढे रोहित म्हणतो, एकंदरीत सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करतायत. पण आम्ही परिस्थिती बघून त्यानुसार प्लेइंग इलेव्हनची निवड करणार आहोत. वेगवेगळ्या खेळपट्ट्यांसाठी वेगवेगळी कौशल्ये आणि रणनीती आवश्यक असतात. त्यामुळे हे स्पष्ट आहे, आम्ही अशा खेळाडूंना घेऊन जाऊ जे सामन्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत.
दरम्यान आता रोहित शर्मा शुबमन गिल आणि सुर्यकुमार यादवपैकी कोणत्या खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
9-13 फेब्रुवारी: पहिली कसोटी, नागपूर
17-21फेब्रुवारी: दुसरी कसोटी, दिल्ली
1-5 मार्च: तिसरी कसोटी, धर्मशाला
9-13 मार्च: चौथी कसोटी, अहमदाबाद
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि सूर्यकुमार यादव