IND vs AUS : Virat Kohli बद्दल काय बोलला भज्जी?.. म्हणाला 'भारताला मालिका जिंकायची असेल तर....

IND vs AUS 2023 :  विराट कोहलीने (Virat Kohli) मागील 3 वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक  (Virat Kohli Century) झळकावलं नाही. त्यामुळे कसोटीतील शतकाचा 3 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येईल का?

Updated: Feb 8, 2023, 03:35 PM IST
IND vs AUS : Virat Kohli बद्दल काय बोलला भज्जी?.. म्हणाला 'भारताला मालिका जिंकायची असेल तर.... title=
Harbhajan Singh, Virat Kohli

Border-Gavaskar Trophy 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेचा पहिला सामना नागपुरात होणार (Nagpur Test) असून उद्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे. मालिका रंगतदार होणार हे आता फिक्स झालंय. अशातच टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) टीम इंडियाचा चॅम्पियन विराट कोहलीबाबत (Virat Kohli) मोठं वक्तव्य केलंय आहे. त्यामुळे आता कांगारूंना आता भारताच्या या वाघापासून लांब सावध रहावं लागेल. (Harbhajan Singh delivers no nonsense verdict On Virat Kohli before India vs Australia 1st Test sports news)

काय म्हणाला Harbhajan Singh?

माझ्या मते ही अशी मालिका आहे जिथं विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट चालणं गरजेचं असेल. एकदा का त्याला सुरुवात झाली की तो थांबणार नाही. या मालिकेत भारतीय संघाला चांगली कामगिरी करायची असेल, तर विराट कोहलीची कामगिरी खूप महत्त्वाची आहे, असं हरभजन सिंह (Harbhajan Singh On Virat Kohli) म्हणाला आहे.

आधी काय झालं ते विसरून जा. त्याच्या टेकनीकमध्ये जा काही दोष होते तो आता मागे राहिलाय. आता सर्व काही ठीक आहे आणि विराट कोहली फॉर्ममध्ये (Virat Kohli) आला आहे. त्यामुळे आता त्याच्याकडून टीम इंडियाला (Team India) खूप जास्त अपेक्षा आहेत.

कोणाला मिळेल संधी ?

टीममध्ये खेळण्यासाठी अनेक खेळाडूंनी दावेदारी ठोकलीये. मात्र, संधी कोणाला मिळणार हे उद्याच कळेल. टीम इंडियाचे ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) हे प्लेईंग इलेव्हनचा हिस्सा असण्याची शक्यता आहे. या तिन्ही खेळाडूंमध्ये सामना पलटण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर फिरकीचा मारा ऑस्ट्रेलियावर भारी पडू शकतो. त्यामुळे आता पहिल्या सामन्यात (IND vs AUS, 1st Test) कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

विराटच्या शतकांचा दुष्काळ संपणार?

दरम्यान, विराट कोहलीने मागील 3 वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलं नाही. त्यामुळे कसोटीतील शतकाचा 3 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येईल का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. तर विराट नक्कीच हा कारनामा करून दाखवेल, असा विश्वास किंग कोहलीच्या चाहत्यांनी व्यक्त केलाय.