रोहित शर्मानं श्रीलंकेतील अपयश धूतलं

 श्रीलंकेमधलं वैयक्तिक अपयश रोहित शर्मानं अखेर धुवून काढलं आहे. 

Updated: Aug 24, 2017, 09:48 PM IST
रोहित शर्मानं श्रीलंकेतील अपयश धूतलं title=

कोलंबो : श्रीलंकेमधलं वैयक्तिक अपयश रोहित शर्मानं अखेर धुवून काढलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं ४५ बॉल्समध्ये ५४ रन्सची खेळी केली. श्रीलंकेमधल्या सलग १० इनिंगनंतर आता ११व्या इनिंगमध्ये रोहितला हाफ सेंच्युरी मारता आली. याआधी ४,०,११,५,५,०,०,४,४,४ अशी रोहित शर्माची श्रीलंकेतली कामगिरी होती.

रोहित शर्माने श्रीलंकेत खेळलेल्या याआधीच्या १० वन डे मॅचमध्ये फक्त आणि फक्त ३७ धावा केल्या होत्या. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की, रोहित शर्माने या १० वन डे मध्ये फक्त एकदाच १० अंकी स्कोअर पार केला होता. एवढंच नाही तर या १० सामन्यात त्याने तीन वेळा आपलं खातंच उघडलं नाही.