Rohit Sharma त्याला टीमबाहेर काढेल...; Dinesh Karthik च्या वक्तव्याने एकच खळबळ!

टीम इंडियाचा (Team India) दिग्गज विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक याच्या वक्तव्याने खळबळ निर्माण झाली आहे. 

Updated: Dec 17, 2022, 08:20 PM IST
Rohit Sharma त्याला टीमबाहेर काढेल...; Dinesh Karthik च्या वक्तव्याने एकच खळबळ! title=

Dinesh Karthik on Rohit Sharma : टीम इंडियाचा (Team India) दिग्गज विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) भारताचा युवा ओपनर शुभमन गिलबाबत (Shubman Gill) एक मोठं विधान केलं आहे. बांगलादेशाविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये (IND vs BAN first test) गिलने चांगली कामगिरी केली. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात दुसऱ्या डावामध्ये त्याने ओपनिंग करत करियरमधील पहिलं शतकंही झळकावलं आहे. ज्यानंतर आता त्याची टीममध्ये जागा पक्की झाल्याचं म्हटलं जातंय. अशातच आता कार्तिकच्या वक्तव्याने खळबळ निर्माण झाली आहे. 

Shubman Gill बाबत दिनेश कार्तिकचं मोठं विधान 

एका बेवसाईटशी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की, "जर बांगलादेशाविरूद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये कर्णधार रोहित शर्माची टीममध्ये कमबॅक झालं तर शुभमन गिल त्याची ओपनची जागा धोक्यात आहे. शुभमन गिलला देखील हे माहिती असेल. मुळात भारतीय क्रिकेट टीमचं हेच वास्तव आहे. सध्याच्या घडीबद्दल आपण बोललो तर, सर्व फॉर्मेटमध्ये ओपनर खेळाडूंची जागा फिक्स आहे." 

"शुभमनने हे दाखवून दिलंय की, तो किती चांगला खेळाडू आहे. त्याने केवळ शतकंच ठोकलं नाहीये, तर तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, त्या पद्धतीने स्पिनर गोलंदाजांसमोर चांगली फलंदाजी करेल. जागतिक दर्जाचा ओपनर बनण्याची क्षमता त्याच्या मध्ये असल्याचंही," दिनेश कार्तिकने सांगितंल आहे.

शुभमन गिलची तुफान फलंदाजी

बांगलादेशविरूद्धच्या (India vs Bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या शुभमन गिलने (Shubman gill) शतक ठोकलं आहे. 148 बॉलमध्ये त्याने हे शतकीय खेळी केली आहे. या खेळीत त्याने 10 फोर आणि 2 सिक्स मारले आहेत. शुभमन गिलला टीम इंडियाच्या पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नव्हती. त्याला निव्वळ 20 धावावर बाद व्हावे लागले होते. त्यामुळे क्रिकेट फॅन्सला त्याच्याकडून शतकाची अपेक्षा होती. 

रोहित शर्माला दुखापत

बांगलादेशाच्या वनडे सामन्यांमध्ये कर्धणर रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो पहिला कसोटी सामना खेळत नाहीय. याचदरम्यान पण, या सगळ्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. कदाचित तो दुसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध राहणार असल्याची शक्यता आहे.