Sachin Tendulkar: "...तर मी तोंड दाखवू शकलो नसतो", सचिन तेंडूलकरने सांगितला 24 वर्षापूर्वीचा किस्सा!

Sachin Tendulkar news: उगाच कोणी 'सचिन तेंडूलकर' होत नाही असं नेहमी ऐकत आलोय. पण का? कित्येक खेळाडू येतील आणि जातील, त्यात काय ऐवढं?, असा सवाल नेहमी उपस्थित होतो.

Updated: Dec 17, 2022, 07:50 PM IST
Sachin Tendulkar: "...तर मी तोंड दाखवू शकलो नसतो", सचिन तेंडूलकरने सांगितला 24 वर्षापूर्वीचा किस्सा! title=
sachin tendulkar

Sachin Tendulkar On Advt Rejection: सचिन रमेश तेंडूलकर...तब्बल अडीच दशकं भारतीय तसेच जागतिक क्रिकेटवर निर्विवाद आधिराज्य गाजवणारा खेळाडू म्हणजे सचिन रमेश तेंडूलकर (Sachin Tendulkar)... दोन दशकापूर्वी बारक्या चिरक्यांचा लाडका 'तेंडल्या' आज क्रिकेटचा देव (God of Cricket) होऊन बसलाय. कुठल्याही महान आणि कर्तृत्ववान खेळाडूला देवत्व बहाल करण्याची परंपरा आजही कायम राहिली आणि आजही या पदवीची मापकाची फुटपट्टी म्हणजे सचिन रमेश तेंडूलकर. (sachin tendulkar reveals about rejection of disrespectful advt marathi news)

उगाच कोणी 'सचिन तेंडूलकर' होत नाही असं नेहमी ऐकत आलोय. पण का? कित्येक खेळाडू येतील आणि जातील, त्यात काय ऐवढं?, असा सवाल नेहमी उपस्थित होतो. मात्र, खेळावर प्रेम आणि खेळातील नितिमत्ता (Ethics) जपणाऱ्या खेळाडूच्या यादीत सर्वोच्च स्थानावर नेहमी सचिनचं नाव राहिल. त्याची अनुभुती दाखवणारा एक किस्सा सचिनने सांगितला आहे.

एका मुलाखतीत सचिनने (Sachin Tendulkar) शारजाह 1998 मध्ये खेळलेल्या दमदार इनिंगनंतरचा एक किस्सा सांगितला. शारजामधील डेझर्ट स्टॉर्म दौऱ्यात धुवांधार इनिंग खेळून सचिन मायदेशात परतला. त्यानंतर एक स्पॉन्सर सचिनला घेऊन एक जाहिरात करणार होता. त्याने सचिनशी माझ्याशी संपर्क साधला. सचिन बॅटने डास, किडे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चेंडू मैदानाबाहेर मारतो, अशी संकल्पना होती. त्यावर सचिनने आक्षेप घेतला (Sachin Tendulkar On Advt Rejection) आणि स्क्रिप्ट बदलण्यास सांगितलं.

आणखी वाचा - Australia vs South Africa: दोन सेकंदात खेळ खल्लास... कॅच पाहून वॉर्नरही झाला शॉक; डोळ्याचं पारणं फेडणारा Video

दरम्यान, मी माझ्या खेळाचा (Cricket) असा अनादर करू शकत नाही. मी माझ्या खेळाची पूजा करतो त्यामुळे, मी ही जाहिरात (Advertisement) करणार नाही, असा पवित्रा सचिनने घेतल्यानंतर जाहिरात बदलण्यात आली. जर मी ती जाहिरात आहे तशी शूट केली असती तर मी घरी तोंड दाखवू शकलो नसतो. मी माझ्या प्रशिक्षकांपुढे (Coach) परत उभा राहू शकलो नसतो, असं सचिन म्हणतो. कोचने मला योग्य मुल्य देखील शिकवली आणि मी नेहमी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला, असंही सचिन म्हणाला होता.