WC Points Table: पाकिस्तानच्या विजयाने बदललं पॉईंट्स टेबलचं समीकरण; टॉप 4 मध्ये या टीम्सचा समावेश

WC Points Table: 11 ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. मंगळवारी पहिल्यांदा बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना झाला. तर दुसरा सामना पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यात रंगला होता.

सुरभि जगदीश | Updated: Oct 11, 2023, 09:09 AM IST
WC Points Table: पाकिस्तानच्या विजयाने बदललं पॉईंट्स टेबलचं समीकरण; टॉप 4 मध्ये या टीम्सचा समावेश title=

WC Points Table: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 ला सुरुवात झाली असून आतापर्यंत 8 सामने खेळवण्यात आले आहेत. 11 ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. मंगळवारी पहिल्यांदा बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना झाला. तर दुसरा सामना पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यात रंगला होता. पहिल्या सामन्यात इंग्लंड तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली. दरम्यान पाकिस्तानच्या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. 

इंग्लंडचा पहिला विजय

बांगलादेश विरूद्ध इंग्लंड या सामन्यामध्ये टॉस गमावून इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. यावेळी डेव्हिड मलान (140), जॉनी बेअरस्टो (52) आणि जो रूट (82) यांच्या खेळीच्या जोरावर 50 ओव्हर्समध्ये 364 रन्स केले. या तीन फलंदाजांशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र बांगलादेशाच्या फलंदाजांना 48.2 ओव्हरमध्ये केवळ 227 रन्स करता आले. त्यामुळे बांगलादेशला 137 रन्सने इंग्लंडचा विजय झाला.

पाकिस्तानचा दुसरा विजय

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दुपारी खेळल्या गेलेल्या सामन्यात दासुन शनाकाने टॉल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रम यांनी शतकं झळकावली. कुसल मेंडिसने 122 रन्स केले तर सदीरा समरविक्रम 108 रन्स करून बाद झाला. या कामगिरीमुळे श्रीलंकेने 344 रन्स केले. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी टीमला विजय मिळवून दिला. अब्दुल्ला शफीकने 113 आणि मोहम्मद रिझवानने 131 रन्स केले. अखेर 6 विकेट्सने टीम इंडियाचा विजय झाला.  

पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल

10 ऑक्टोबर रोजी झालेल्या डबल हेडर सामन्यानंतर आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 च्या पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंड बांगलादेशचा पराभव करून पाचव्या स्थानावर पोहोचलीये. तर 2 दोन सामने जिंकणारी पाकिस्तानची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या टीमला 2 पराभव स्किकारावे लागले असून ती आठव्या स्थानावर आहे. 

यामध्ये न्यूझीलंडची टीम टॉप-1 वर आहे. त्याच्या खात्यात दोन पॉईंट्स असून नेट रनरेट 1.958 आहे. इंग्लंडच्या विजयानंतर बांगलादेश टॉप-4 मधून बाहेर पडली असून भारत आता चौथ्या क्रमांकावर आहे.