नितीश राणाच्या पत्नीचा अज्ञातांकडून पाठलाग; पोलिसांनी दिलेला सल्ला पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Viral Video : प्रसिद्ध क्रिकेटपटू नितीश राणा याची पत्नी मारवाहला घराबाहेर पडण्यास भीती वाटते आहे. कारण दोन अज्ञात तरुणाने तिच्या गाडीचा पाठलाग केल्याचा समोर आलं आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 7, 2023, 08:18 PM IST
नितीश राणाच्या पत्नीचा अज्ञातांकडून पाठलाग; पोलिसांनी दिलेला सल्ला पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल title=
Nitish Rana Wife Saachi Marwahs car hauled by two youths in Delhi video goes viral Trending news Shocking advice from Delhi Police

Nitish Ranas Wife : केकेआरचा (Kolkata knight riders) कर्णधार नितीश राणा (IPL 2023)आयपीएल 2023 मध्ये हैदराबादचं नेतृत्त्व करत आहे. त्यामुळे तो सध्या अतिशय बिझी आहे. पण दुसरीकडे त्याची बायको साची मारवाह (Saachi Marwahs) हिला घराबाहेर पडणं मुश्कील झालं आहे. ती सध्या दहशतेखाली आहे. कारण 4 मे गुरुवारी दिल्लीत तिच्यासोबत एक संतापजनक घटना घडली. त्यानंतर ती घाबरलेली आहे. तिने या घटनेबद्दल  इन्स्टाग्राम स्टोरीवर (Instagram story) सांगितलं आहे. 

त्या दोघांनी...

ती कामावरुन परत असताना दोन अज्ञात तरुणांनी तिच्या गाडीचा पाठलाग केला. एवढंच नाही तर तिच्या कारला जोरदार धडकही दिली. तिने या घटनेबद्दल दिली पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.  

दिल्ली पोलिसांचा अजब सल्ला

साचीने इन्स्टाग्रामवर तिचा सोबत घडलेला प्रकाराबद्दल सांगितलं आहे. या धक्कादायक घटनेची माहिती तिने जेव्हा दिल्ली पोलिसांना (Delhi Police) दिली तेव्हा त्यांनी तिला अजब सल्ला दिला. ते ऐकून तुम्ही चक्रावून जाल.  पोलीस म्हणाले की, आता तू सुरक्षित घरी पोहोचल्या आहात. त्यामुळे झालं गेलं विसरून जा. ते पुढे म्हणाले की, तर या पुढे अशी घटना घडली तर गाडीचा नंबर नोट करून ठेवा, असा सल्लाही पोलिसांनी तिला दिला. हा सल्ला ऐकून दिल्ली पोलिसांच्या वागण्यावर साचीला प्रंचड धक्का बसला आहे. (Nitish Rana Wife Saachi Marwahs car hauled by two youths in Delhi video goes viral Trending news Shocking advice from Delhi Police)

त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या कार्याक्षेत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात आहे.  दरम्यान नुकताच मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणात पोलिसांनी पश्चिम दिल्लीतून दोघांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त घनश्याम बन्सस यांनी याबद्दल माहिती दिली आहे. कीर्ती नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 345डी, 427 आणि 506 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव आरोपी चैतनय शिवम हा 18 वर्षांचा असून तो पांडव नगरमधील रहिवासी आहे. तर विवेक हा देखील 18 असून तो पटेल नगरमधील रहिवासी आहे.