बांगलादेशची जबरदस्त बॉलिंग, श्रीलंका मोठ्या संकटात

निडास ट्रॉफीत श्रीलंका आणि बांगलादेशसाठी 'आज करो वा मरो'ची मॅच होत आहे. मात्र, मॅचमध्ये श्रीलंकेला एक मोठा झटका बसला आहे.

Sunil Desale Updated: Mar 16, 2018, 08:10 PM IST
बांगलादेशची जबरदस्त बॉलिंग, श्रीलंका मोठ्या संकटात  title=

कोलंबो : निडास ट्रॉफीत श्रीलंका आणि बांगलादेशसाठी 'आज करो वा मरो'ची मॅच होत आहे. या स्पर्धेत भारताने आधीच फायनलमध्ये मजल मारलीये त्यामुळे बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात जिंकणारी टीम फायनल गाठणार आहे. मात्र, श्रीलंकेला एक मोठा झटका बसला आहे.

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या मॅचमध्ये बांगलादेशच्या बॉलर्सने जबरदस्त बॉलिंग करत लंकेला अडचणीत आणलं आहे.

श्रीलंकेची अर्धी टीम ५० रन्स करण्यापूर्वीच माघारी परतली. त्यामुळे १० ओव्हर्सपूर्ण होण्याअगोदरच श्रीलंकेची अर्धी टीम पेवेलियनमध्ये परतलेली होती. 

दोन्ही संघाकडे एका विजयासह प्रत्येकी दोन दोन गुण आहेत. श्रीलंकेने पहिल्या सामन्यात भारताला हरवले होते. त्यानंतर बांगलादेशने श्रीलंकेला सहजरित्या हरवले. 

तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशला सहा विकेटनी हरवले. यामुळे तिनही संघाकडे प्रत्येकी दोन गुण झाले होते. त्यानंतर भारताने बांगलादेश आणि श्रीलंकेला हरवत फायनल गाठली.