SMAT 2024 Final: श्रेयस अय्यरची चॅम्पियन मुंबई! जिंकला सय्यद मुश्ताक अली करंडक, मध्य प्रदेशचा 5 गडी राखून पराभव

Mumbai Won Syed Mushtaq Ali Trophy 2024: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा चॅम्पियन बनला आहे. अंतिम फेरीत मध्य प्रदेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 16, 2024, 09:07 AM IST
SMAT 2024 Final: श्रेयस अय्यरची चॅम्पियन मुंबई! जिंकला सय्यद मुश्ताक अली करंडक, मध्य प्रदेशचा 5 गडी राखून पराभव title=
Photo Credit: PTI

Mumbai vs Madhya Pradesh SMAT 2024 Final: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा चॅम्पियन बनला आहे. अंतिम फेरीत मध्य प्रदेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुंबईने मध्य प्रदेशचा ५ गडी राखून पराभव केला. बेंगळुरू येथे झालेल्या या सामन्यात मध्य प्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करत रजत पाटीदार (81 धावा*) च्या नाबाद कर्णधार खेळीच्या जोरावर 174 धावा केल्या. दरम्यान या धावांना प्रत्युत्तरात देत सूर्यकुमार यादव (48 धावा) आणि सूर्यांश शेडगे (36 धावा*) यांनी मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

रजत पाटीदारची मेहनत ठरली व्यर्थ 

मध्य प्रदेशचा निम्मा संघ 100 धावांच्या आतच पॅव्हेलियनमध्ये परतला. पण रजत पाटीदार नाबाद राहिला आणि त्याने अवघ्या 40 चेंडूत 81 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि तितक्याच षटकारांचा समावेश होता. या धावा त्याने 200 च्या वरच्या स्ट्राईक रेटने केल्या. संघातील इतर कोणत्याही फलंदाजाला 30 धावाही करता आल्या नाहीत. मुंबईकडून शार्दुल ठाकूर आणि रॉयस्टन डीएसने 2-2 विकेट्स घेतल्या. 

हे ही वाचा: Champions Trophy: "ICC देतंय लॉलीपॉप...", PCB च्या 'या' निर्णयावर पाकिस्तानच्या बासित अली चिडला, बघा Video

 

सूर्यकुमार-सूर्यांश जोडीने विजय खेचून आणला

174 धावांचा आव्हान मिळाल्यावर भारतही सज्ज झाला.पण सुरुवातीला मुंबईने पृथ्वी शॉ (10 धावा) आणि श्रेयस अय्यर (16 धावा) यांच्या रूपाने केवळ 47 धावांवर दोन विकेट गमावल्या. मात्र, यानंतर अजिंक्य रहाणे (37 धावा) आणि सूर्यकुमार यादव (48 धावा) यांनी सामन्यात मुंबईचे पुनरागमन केले आणि तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. रहाणे आणि सूर्या बाद झाल्यानंतर, सूर्यांश शेडगेने चौकार आणि षटकार खेचले आणि 15 चेंडूत तीन चौकार आणि तब्बल षटकारांसह नाबाद 36 धावा करत मध्य प्रदेशचा विजय हिसकावून घेतला. विजयी षटकार अथर्व अंकोलेकरच्या (१६ धावा*) फलंदाजीतून आला.

हे ही वाचा: मैदानात घुसले हार्दिक पांड्याचे 3 चाहते, मिठी मारली... पायाला स्पर्श केला आणि मग...

अय्यर यांच्या हस्ते युवकांना देण्यात आली ट्रॉफी

चॅम्पियन बनल्यानंतर, श्रेयस अय्यरला BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली, ज्यांनी आपल्या युवा सहकाऱ्यांना देऊन विजेतेपदाचा आनंद साजरा केला.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x