Pollard Hints No Rest For Jasprit Bumrah : आयपीएलनंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2024) आयोजित करण्यात आलं आहे. येत्या 1 जूनपासून क्रिकेटच्या महाकुंभाचा शंखनाद होईल. तर टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध (IND vs IRE) होणार आहे. तसेच पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामना 9 जून रोजी (IND vs PAK) खेळवला जाईल. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी (Team India Squad For T20 WC 2024) टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत. अशातच आता टीम इंडिया पुन्ही तीच चूक करत असल्याचं स्पष्ट समोर आलं आहे.
मागील टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची परिस्थिती पाहिली तर टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं होतं. मोक्याच्या क्षणी जसप्रीत बुमराह टीम इंडियातून बाहेर गेला अन् टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. त्यावेळी वर्ल्ड कपआधी खेळाडूंना आराम द्यावा, अशी मागणी अनेक दिग्ग्जांनी केली होती. मात्र, बीसीसीआयने खेळाडूंना विश्रांती न दिल्याने अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. आता पुन्हा बीसीसीआय तीच चूक करत असल्याचं दिसतंय.
टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंना आराम देण्यात यावा, अशी मागणी सध्या तज्ज्ञांकडून केली जात आहे. जसप्रीत बुमराह हा टीम इंडियासाठी प्रभावी ठरू शकतो. तसेच रोहित शर्माला देखील आराम मिळायला हवा, अशी विचारणा माजी खेळाडूकडून होत आहे. मात्र, मुंबई इंडियन्सचे कोच कायरन पोलार्डने बुमराहला आराम देण्यास नकार दर्शवला आहे.
काय म्हणाला पोलार्ड?
टी-२० वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर बुमराहला विश्रांती देण्यावर पोलार्डला प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी पोलार्ड म्हणाला, आम्ही याबद्दल काहीही बोललो नाही. हे माझे काम आहे, असे मला वाटत नाही पण बघूया काय होते ते. आम्ही सर्वजण संपूर्ण आयपीएल खेळण्यासाठी येथे आहोत. आयपीएल पूर्ण करण्याचं आमचं लक्ष्य आहे, असं पोलार्डने म्हटलं आहे. त्याचबरोबर टी-20 वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्माला ब्रेकची गरज असल्याचं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल क्लार्कनं केलं आहे. खेळाडूंना ब्रेक मिळाला तर पूर्ण तयारीनिशी मैदानात येतील, असंही त्याने यावेळी म्हटलंय.
टी-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू - शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.