IND vs AUS : 'के एल राहूलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडावं...', माजी क्रिकेटरचे मोठं विधान

IND vs AUS KL Rahul Performance : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडून के एल राहूलची  (KL Rahul) पाठराखण होत असली तरी माजी क्रिकेटर मात्र त्याच्या कामगिरीवर अजिबात खुश नाही आहे. अनेक क्रिकेटर्सने त्याच्या खेळावर टीका केली. 

Updated: Feb 20, 2023, 04:22 PM IST
IND vs AUS : 'के एल राहूलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडावं...', माजी क्रिकेटरचे मोठं विधान title=

IND vs AUS KL Rahul Performance : टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहूल (KL Rahul) गेल्या काही सामन्यांपासून खराब फॉर्मचा सामना करतोय. ऑस्ट्रेलिया विरूद्ध दोन टेस्ट सामन्यात देखील त्याला फारसा काही कमाल दाखवता आला नाही. त्यामुळे त्याच्या खेळीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतेय. मात्र टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी त्याची पाठराखण केली होती. मात्र तरीही टीम इंडियाच्या माजी खेळाडूंकडून के एल राहूलवर  (KL Rahul) टीका सूरूच आहे. एका माजी क्रिकेटरने तर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचाच सल्ला दिला आहे. हा माजी क्रिकेटर कोण आहे? हे जाणून घेऊयात.  

 

हे ही वाचा : Ravindra Jadeja इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतो,ऑस्ट्रेलियाशी खास कनेक्शन

 

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडून के एल राहूलची  (KL Rahul) पाठराखण होत असली तरी माजी क्रिकेटर मात्र त्याच्या कामगिरीवर अजिबात खुश नाही आहे. अनेक क्रिकेटर्सने त्याच्या खेळावर टीका केली. टीम इंडियाचा माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंहने (harbhajan singh) तर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून, देशांतर्गंत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या या सल्ल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.  

राहूलच्या जागी गिलला संधी

बीसीसीआयने पुढच्या दोन टेस्ट सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. या संघात के एल राहूलचे उपकर्णधार पद काढून घेण्यात आले आहे. यावर हरभजन सिंह (harbhajan singh) म्हणाला की, “होय तो आता उपकर्णधार नाही. संघाची घोषणा करण्यात आली आहे.मला असे वाटते की त्याला उपकर्णधारपद न देण्याचे कारण म्हणजे, केएल राहुलच्या जागी पुढील सामन्यासाठी शुभमन गिलची निवड केली जाईल.

टीम इंडियाचा युवा खेळाडू शुभमन गिलला संघात संधी मिळण्याची हीच योग्य वेळ आहे. तो यासाठी पात्र देखील आहे. आणि सलामीवीर म्हणून तो महत्त्वपूर्ण धावा करण्यासाठी तो चांगल्या स्थितीत होता, त्यामुळे भारताला सध्या त्यांच्या फलंदाजीत आवश्यक ती दर्जेदार सुरुवात मिळेल, अशी अपेक्षा हरभजनने व्यक्त (harbhajan singh) केली आहे. तसेच गिल गेल्या काही दिवसांपासून एकदिवसीय आणि टी20 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे मला वाटते की त्याला नक्कीच संधी मिळेल.

डॉमेस्टीक क्रिकेट खेळावे 

राहुल  (KL Rahul) कठीण काळातून जात आहे. त्याच्याकडे खूप गुणवत्ता आहे आणि तो मोठा खेळाडू आहे. पण त्याचे आकडे चांगले नाही आहेत. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वेळ काढून देशांतर्गत क्रिकेट खेळायला जावे, जेणेकरुन त्याच्या फलंदाजीचे कौशल्य वाढेल, असे हरभजनने (harbhajan singh) सुचवले आहे. 

दरम्यान टीम इंडियाने रविवारी ऑस्ट्रेलियावर 6 विकेट राखून विजय मिळवला.या विजयासह टीम इंडियाने 2-0ने मालिकेत आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या टेस्ट सामन्यात राहूलला  (KL Rahul) संधी मिळते की शुबमन गिल संघात पुनरागमन करतो, हे पाहावे लागणार आहे.