KL Rahul: तो खूप कठीण काळ...; ' ट्रोलिंगच्या विषयावर अखेर के.एल राहुलने सोडलं मौन

KL Rahul: रोहित शर्मा, ईशान किशान आणि श्रेयस अय्यर हे महत्त्वाचे फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर के.एल राहुलने कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. या सामन्यात राहुलने 97 रन्सची विजयी खेळी खेळली. दरम्यान सामन्यानंतर के.एल राहुलने ( KL Rahul ) ट्रोलिंगची कहाणी सांगितली आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 10, 2023, 09:54 AM IST
KL Rahul: तो खूप कठीण काळ...; ' ट्रोलिंगच्या विषयावर अखेर के.एल राहुलने सोडलं मौन title=

KL Rahul: रविवारी ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो के.एल राहुल ( KL Rahul ) . रोहित शर्मा, ईशान किशान आणि श्रेयस अय्यर हे महत्त्वाचे फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर के.एल राहुलने कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. या सामन्यात राहुलने 97 रन्सची विजयी खेळी खेळली. दरम्यान सामन्यानंतर के.एल राहुलने ( KL Rahul ) ट्रोलिंगची कहाणी सांगितली आहे. 

केएल राहुलला अनेकदा चाहत्यांकडून रोष आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यावेळी केएल राहुलने ( KL Rahul ) सांगितलं की, त्याच्यावर सतत होणाऱ्या टीकेमुळे त्याला त्रास झाला. इतकंच नाही तर त्याला आश्चर्य वाटलं कारण त्याची कामगिरी इतकी वाईट नव्हती.

ट्रोलिंगबाबत काय म्हणाला के.एल राहुल?

मे 2023 मध्ये आयपीएल के.एल राहुलला ( KL Rahul ) दुखापत झाली होती. यावेळी दुखापतीमुळे अनेक महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं होतं. राहुल गेल्या महिन्यात आशिया कप दरम्यान टीममध्ये परतला होता. 

राहुलने 'स्टार स्पोर्ट्स'ला सांगितलं की, 'माझ्यावर अनेकदा खूप टीका झाली. लोक प्रत्येक सामन्यात आणि परिस्थितीत माझ्या कामगिरीवर भाष्य करत होते. दरम्यान हे असं का होत आहे हे मला समजू शकलं नाही. याचं कारण म्हणजे माझी कामगिरी तितकीशी वाईट नव्हती. पण त्यावेळी केलेली टीका खूप वेदनादायक होती.

किरकोळ दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांतून बाहेर पडल्यानंतर राहुलने तीन डावांमध्ये 84.50 च्या सरासरीने आणि 89.41 च्या स्ट्राईक रेटने 169 रन्स केले. ज्यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. 

राहुल ( KL Rahul ) पुढे म्हणाला, 'मला दुखापतीमुळे होणाऱ्या वेदना आणि रिकवरीची प्रक्रिया माहीत आहे. त्यानंतर मी आयपीएलदरम्यान जखमी झालो. जेव्हा मला समजलं की, मला चार ते पाच महिने मला खेळता येणार नाही.  वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्याचं 100 टक्के निश्चित नव्हते, तेव्हा तो खूप कठीण काळ होता.''