मुंबई: देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व काळजी घेऊन सुरू असलेली आयपीएल अखेर स्थगित करण्याची वेळ बीसीसीआयवर आली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी बातमी आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BCCIने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संघातील 4 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएलचे पुढचे सामने स्थगित करण्यात आले आहेत.
BCCIचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही घोषणा केली आहे. कोलकाता संघातील 2 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर हैदराबाद संघातील एका खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
UPDATE: The Indian Premier League Governing Council (IPL GC) and Board of Control for Cricket in India (BCCI) in an emergency meeting has unanimously decided to postpone IPL 2021 season with immediate effect.
Details - https://t.co/OgYXPj9FQy pic.twitter.com/lYmjBId8gL
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2021
IPL 2021 suspended owing to increase in Covid-19 cases
Read @ANI Story I https://t.co/dujUU8iZcl pic.twitter.com/1B7P5uuxTQ
— ANI Digital (@ani_digital) May 4, 2021
BREAKING: Wriddhiman Saha is reported to have tested postive to Covid.
— Peter Lalor (@plalor) May 4, 2021
चेन्नई सुपर किंग्जचे CEO काशी विश्वनाथन, गोलंदाजांचे प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस क्लिनर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई विरुद्ध मुंबई झालेल्या सामन्या दरम्यान CSKचे बॉलिंग कोच मुंबई संघातील काही लोकांच्या संपर्कात आले होते.
दुसरीकडे बीसीसीआयने दिल्ली संघाला क्वारंटाइन राहण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी कोलकाता संघातील संदीप वॉरियर आणि वरूण चक्रवर्ती या दोघांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित करण्यात आला होता.