मुंबईः पंजाब किंग्जचा बॅट्समॅन ख्रिस गेलने सोमवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळलेल्या आयपीएल सामन्यात छक्क्यांचा वर्षाव केला. वयाच्या 41 व्या वर्षी ख्रिस गेलच्या बॅटींगमध्ये चक्क 20 वर्षांचा तरुणासारखा जोश आणि उत्साह दिसत होता. राजस्थान रॉयल्सविरुद्ध ख्रिस गेलने 28 चेंडूत 40 धावा फटकावल्या आहेत.
ख्रिस गेलच्या स्फोटक डावात 4 चौके आणि 2 छक्क्यांचा समावेश आहे. ख्रिस गेलची स्फोटक बॅटींग पाहून पंजाब किंग्जची सह-मालक प्रीती झिंटा खूप खूश झाली. ख्रिस गेलने जेव्हा 9व्या ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा स्पिनर राहुल तेवतियाच्या बॅालवर सिक्स मारला, तेव्हा प्रीती झिंटा उभी राहून टाळ्या वाजवत आनंदाने नाचताना दिसली.
गेलचा नवा रेकॅार्ड
ख्रिस गेलने केएल राहुलबरोबर दुसर्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. गेल स्पिनर रियान परागच्या बॅालवर स्टोक्सच्या कॅचमुळे आऊट झाला. परंतु यावेळी ख्रिस गेल त्याच्या छक्क्यांमुळे आयपीएलमध्ये 351 छक्के मारणारा पहिला बॅट्समॅन ठरला. ख्रिस गेलने आयपीएलच्या 133 सामन्यात 351 छक्के मारले आहेत.
आयपीएलच्या इतिहासात गेलपेक्षा जास्त सिक्सर कोणीही मारले नाहीत. एवढचं काय तर त्याचा हा रेकॅार्ड मोडण्यासाठी कोणताही खेळाडू त्याच्या आसपास देखील नाही. गेल नंतर दुसर्या क्रमांकावर आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त छक्के मारलेला खेळाडू एबी डिव्हिलियर्स आहे, त्याच्या नावावर 237 छक्के आहेत. तर तिसर्या क्रमांकावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे आणि त्याच्या नावावर 216 छक्के आहेत. गेलच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण 6 शतके आहेत. दुसर्या क्रमांकावर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आहे, त्याच्या नावावर 5 शतके आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे आणि त्याच्या नावावर 4 शतके आहेत.
संजू सॅमसनने त्याच्या कारकीर्दीतील तिसरे आयपीएल शतक मारुन सुद्धा राजस्थान रॉयल्सला सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जच्या विरोधात चार धावांनी पराभव पत्करावा लागला. ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय रंजक होती. शेवटच्या बॉलवर सॅमसनला संघ जिंकण्यासाठी पाच धावांची गरज होती पण तो आउट झाला आणि त्यामुळेच ही मॅच पंजाबच्या पदरात पडली.