मुंबई | आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्यातील खेळाला 19 सप्टेंबरपासूवन सुरुवात होत आहे. या दुसऱ्या टप्प्यासाठी क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक क्रिकेट फॅन उत्सुक आहे. या दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) बॅटिंगबाबत विधान केलं आहे. (ipl 2021 2nd phase csk captain ms dhoni difficult to run quickly coming to bat after retiring says gautam gambhir)
गंभीर काय म्हणाला?
"आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीला बॅटिंग करताना धावा करणं अवघड ठरतंय. धोनी साधारण चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करायला येतो. मात्र धोनी आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात 6-7 व्या क्रमांकावर बॅटिंगला उतरला. काही वेळा तर धोनीने स्वत: आधी सॅम करनला बॅटिंगसाठी पुढच्या क्रमांकावर पाठवलं. कदाचित यामागे धोनीचा विकेटकीपिंग आणि मेन्टरपदाकडे वळण्याचा प्रयत्न असावा. जेणेकरुन धोनीला आणखी जोराने कर्णधारपदासह विकेटकिपींग करता येईल" असं गंभीरने नमूद केलं.
"धोनीला धावा करणं अवघड ठरतंय. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएलमध्ये खेळणं आव्हानात्मक ठरतं. आयपीएलमध्ये तुम्हाला अव्वल आणि विश्व स्तरावरच्या गोलंदाजांचा सामना करावा लागतो", असंही गंभीर म्हणाला.
गंभीरचा ख्रिस गेलला सल्ला
पंजाब किंग्सचा आक्रमक सलामवीर ख्रिस गेलने दुसऱ्या टप्प्यात सलामीला खेळायला यायला हवं. गेलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणं हे आकलनापलीकडचं होईल अस गंभीरने सांगितलं.
"गेलला ओपनिंग करायला हवी. तुमच्या संघात गेलसारखा आक्रमक फलंदाज आहे. मग त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यात काहीही अर्थ नाही. वेस्टइंडिज आणि पंजाबने हीच चूक केली. यांनी असं का केलं हे मला समजलं नाही. गेल जर प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल, तर त्याने सलामीवीर म्हणून यावं. कारण गेल चेंडू वाया न घालवता सुरुवातीपासून आक्रमक खेळी करतो. तेच गेल 3 नंबरवर बँटिगवर आला तर त्याला ओपनिंगच्या तुलनेत सिंगल-डबल धावा घ्यावा लागतात", असं गंभीर म्हणाला.