IND vs AUS: सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा थरारक विजय; नॅशनल क्रशने ऑस्ट्रेलियाला लोळवलं!

भारताने टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करत 188 रन्सचं लक्ष्य दिलं. या सामन्यात टीम इंडियाने या लक्ष्याचा पाठलाग करत 187 रन्स केले. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हर (Super over) खेळवण्यात आली. अखेर सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा विजय झाला.

Updated: Dec 11, 2022, 10:50 PM IST
IND vs AUS: सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा थरारक विजय; नॅशनल क्रशने ऑस्ट्रेलियाला लोळवलं! title=

IND-W VS AUS-W 2nd T20I: भारतीय महिला क्रिकेट (Team India Womens) टीमचा आज ऑस्ट्रेलियन (AUS) महिलांसोबत टी-20 सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाचा धडाक्यात विजय झाला आहे (Indian women's team beat Australia). यावेळी भारताने टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करत 188 रन्सचं लक्ष्य दिलं. या सामन्यात टीम इंडियाने या लक्ष्याचा पाठलाग करत 187 रन्स केले. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हर (Super over) खेळवण्यात आली. अखेर सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा विजय झाला.

असा रंगला सुपर ओव्हरचा थरार

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसऱ्या टी-20 सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पहायला मिळाला. भारताने सुपर ओव्हरमध्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. सुपर ओव्हरमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत 20 रन्स केले. ऋचा घोषने सुपर ओव्हरच्या सुरुवातील सिक्स मारली आणि दुसऱ्याच बॉलला तिची विकेट गेली.

यानंतर हरमनप्रीत कौर मैदानात उतरली आणि तिने एक रन घेतला. चौथ्या बॉलवर स्मृती मानधनाने फोर मारली आणि पाचव्या बॉलवर तिने सिक्स मारली. तर शेवटच्या बॉलवर मानधना आणि हरमनप्रीतने 3 रन्स काढले. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 21 रन्सची गरज होती, मात्र महिला 16 रन्सचं करू शकल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज रेणूका ठाकूर हिने उत्तम गोलंदाजी केली.

स्मृती मानधनाचा रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट टीमची सलामीची फलंदाज स्मृती मानधना या सामन्यात अर्धशतक झळकावून अनोखा विक्रम केला. स्मृती मानधना महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 हून अधिक स्कोअर करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचलीये. लक्ष्याचा पाठलाग करताना या फॉरमॅटमधील तिने 12 वेळा पन्नास हून अधिक रन्स केलेत. या प्रकरणात मंधानाने वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरचा रेकॉर्ड मोडला.

याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2500 किंवा त्याहून अधिक रन्स करणारी मंधाना ही भारताची दुसरी तसंच जगातील नववी महिला क्रिकेटपटू ठरलीये. भारतासाठी आतापर्यंत केवळ कर्णधार हरमनप्रीत कौर हिने हा पराक्रम केला होता.